Join us  

India’s squads for AUS & SA series : मोहम्मद शमी, दीपक चहर ट्वेंटी-२० संघात परतले; ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर 

India’s squads for AUS & SA series : आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीनंतर आता भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची तयारी म्हणून घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 6:01 PM

Open in App

India’s squads for AUS & SA series : आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीनंतर आता भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची तयारी म्हणून घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांचा सामना करणार आहे. २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर आफ्रिकेविरुद्ध तीन ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. BCCI ने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसोबतच ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी आज संघ जाहीर केले. वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणारे खेळाडू या दोन्ही मालिकेत कायम ठेवले गेले आहेत. मोहम्मद शमी, दीपक चहर यांचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह ( India Squad for Australia T20Is: Rohit Sharma (Captain), KL Rahul (vice-captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, Rishabh Pant (wicket-keeper), Dinesh Karthik (wicket-keeper), Hardik Pandya, R. Ashwin, Yuzvendra Chahal, Axar Patel, Bhuvneshwar Kumar, Mohd. Shami, Harshal Patel, Deepak Chahar, Jasprit Bumrah.) 

  • ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक  - २० सप्टेंबर- मोहाली, २३ सप्टेंबर - नागपूर व २५ सप्टेंबर- हैदराबाद

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा ट्वेंटी-२० संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,  दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह ( India squad for South Africa T20Is: Rohit Sharma (Captain), KL Rahul (vice-captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, Rishabh Pant (wicket-keeper), Dinesh Karthik (wicket-keeper), R. Ashwin, Yuzvendra Chahal, Axar Patel, Arshdeep Singh, Mohd. Shami, Harshal Patel, Deepak Chahar, Jasprit Bumrah.)

  • द. आफ्रिकेविरुद्धचे वेळापत्रक - २८ सप्टेंबर- तिरुअनंतपूरम, २ ऑक्टोबर - गुवाहाटी व ४ ऑक्टोबर- इंदूर

नोट - हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग व भुवनेश्वर कुमार या मालिकांदरम्यान मिळालेल्या विश्रांतीत NCA मध्ये दाखल होणार आहेत.   

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाबीसीसीआय
Open in App