आर अश्विन २०२३मधील सर्वोत्तम कसोटी खेळाडूच्या शर्यतीत; ऑस्ट्रेलियाच्या दोघांना देतोय टक्कर 

आयसीसीने शुक्रवारी २०२३ सालमधील सर्वोत्तम कसोटी खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 04:59 PM2024-01-05T16:59:48+5:302024-01-05T17:00:27+5:30

whatsapp join usJoin us
India’s star spinner Ravichandran Ashwin will be in the running for the ICC Men’s Test Cricketer of the Year for the third time | आर अश्विन २०२३मधील सर्वोत्तम कसोटी खेळाडूच्या शर्यतीत; ऑस्ट्रेलियाच्या दोघांना देतोय टक्कर 

ICC Test Cricketer Of The Year nominees

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयसीसी २०२३ पुरस्काराची नामांकन

  • सर्वोत्तम क्रिकेटपटू - विराट कोहली, रवींद्र जडेजा, ट्रॅव्हिस हेड, पॅट कमिन्स
  • सर्वोत्तम कसोटीपटू - आर अश्विन, ट्रॅव्हिस हेड, जो रूट, उस्मान ख्वाजा
  • वन डेतील सर्वोत्तम खेळाडू - विराट कोहली, शुबमन गिल, मोहम्मद शमी, डॅरिल मिचेल

ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम खेळाडू - सूर्यकुमार यादव, सिकंदर रझा, मार्क चॅम्पमन, रामजानी

 
ICC Test Cricketer Of The Year nominees  (Marathi News) :  आयसीसीने शुक्रवारी २०२३ सालमधील सर्वोत्तम कसोटी खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली. भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन ( R Ashwin ) हा या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. त्याच्यासह ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड व उस्मान ख्वाजा आणि इंग्लंडचा जो रूट यालाही नामांकन मिळाले आहे.


आर अश्विनने २०२३ मध्ये ७ कसोटी सामन्यांत ४१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २०१६ साली सर्वोत्तम कसोटी खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता आणि २०२१ मध्ये त्याला नामांकन मिळाले होते. भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपर्यंतच्या प्रवासात आऱ अश्विनने महत्त्वाचा वाटा उचलला होता.  शिवाय त्याने घरच्या मैदानावर झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ४ सामन्यांत २५ विकेट्स घेत भारताकडे जेतेपद कायम राखले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक ११४ विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा मान पटकावला. त्याने अनिल कुंबळे ( १११) यांना मागे टाकले. या मालिकेत त्याने ८६ धावाही केल्या होत्या आणि मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला होता. पण, त्याला फायनलमध्ये संधी मिळाली नाही.  बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटीनंतर तो जागतिक क्रमवारीत नंबर वन कसोटी गोलंदाज बनला होता.   

Nominees for ICC Men's Test Cricketer of the Year 2023
या पुरस्कारासाठी अश्विन समोर ट्रॅव्हिस हेडचे कडवे आव्हान आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये हेडने भारताची डोकेदुखी वाढवून जेतेपद ऑस्ट्रेलियाला मिळवून दिले होते. त्याने २०२३ मध्ये १२ सामन्यांत ९१९ धावा केल्या आहेत.  ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजानेही २०२३ मध्ये १३ सामन्यांत १२१० धावा केल्या, तर  इंग्लंडच्या जो रूटे ८ सामन्यांत ७८७ धावा  व ८ विकेट्स घेतल्या आहेत.  

Web Title: India’s star spinner Ravichandran Ashwin will be in the running for the ICC Men’s Test Cricketer of the Year for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.