आयसीसी २०२३ पुरस्काराची नामांकन
- सर्वोत्तम क्रिकेटपटू - विराट कोहली, रवींद्र जडेजा, ट्रॅव्हिस हेड, पॅट कमिन्स
- सर्वोत्तम कसोटीपटू - आर अश्विन, ट्रॅव्हिस हेड, जो रूट, उस्मान ख्वाजा
- वन डेतील सर्वोत्तम खेळाडू - विराट कोहली, शुबमन गिल, मोहम्मद शमी, डॅरिल मिचेल
ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम खेळाडू - सूर्यकुमार यादव, सिकंदर रझा, मार्क चॅम्पमन, रामजानी
ICC Test Cricketer Of The Year nominees (Marathi News) : आयसीसीने शुक्रवारी २०२३ सालमधील सर्वोत्तम कसोटी खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन जाहीर केली. भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन ( R Ashwin ) हा या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. त्याच्यासह ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड व उस्मान ख्वाजा आणि इंग्लंडचा जो रूट यालाही नामांकन मिळाले आहे.
आर अश्विनने २०२३ मध्ये ७ कसोटी सामन्यांत ४१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २०१६ साली सर्वोत्तम कसोटी खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता आणि २०२१ मध्ये त्याला नामांकन मिळाले होते. भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपर्यंतच्या प्रवासात आऱ अश्विनने महत्त्वाचा वाटा उचलला होता. शिवाय त्याने घरच्या मैदानावर झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत ४ सामन्यांत २५ विकेट्स घेत भारताकडे जेतेपद कायम राखले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक ११४ विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा मान पटकावला. त्याने अनिल कुंबळे ( १११) यांना मागे टाकले. या मालिकेत त्याने ८६ धावाही केल्या होत्या आणि मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला होता. पण, त्याला फायनलमध्ये संधी मिळाली नाही. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटीनंतर तो जागतिक क्रमवारीत नंबर वन कसोटी गोलंदाज बनला होता.