India's T20 World Cup full schedule : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी गुरुवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे दोन प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला मुकणार आहेत. भारताने जडेजाची रिप्लेसमेंट म्हणून अक्षर पटेलची निवड केली, परंतु जसप्रीतच्या जागी संघात कोणाला स्थान मिळते याची उत्सुकता लागली आहे. मोहम्मद शमी व दीपक चहर हे दोन पर्याय भारतासमोर आहेत. पण, याचा निर्णय ऑस्ट्रेलियातील सराव सत्रानंतरच घेतला जाईल, असे कर्णधार रोहित शर्माने जाहीर केले. २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे, परंतु तत्पूर्वी टीम इंडिया चार सामने खेळणार आहे.
New Rule! वर्ल्ड कप स्पर्धेत हे ५ नवीन नियम ठरतील निर्णायक; कर्णधारांची कसोटी
ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. भारताच्या मिशन वर्ल्ड कपच्या मार्गात अडथळे येताना दिसत आहेत. जडेजानंतर मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही दुखापतीमुळे माघार घेतली. तंदुरुस्त नसतानाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्याचा BCCI चा निर्णय महागात पडला.
मोहम्मद शमी मागील वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० खेळलेलाच नाही. अशात त्याची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे. आता जसप्रीतच्या अनुपस्थितीत तो मुख्य संघात एन्ट्री करेल अशी शक्यता आहे. त्याला सराव मिळावा यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत निवड केली. पण, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्याची संधी हुकली. त्याला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे आणि त्यानंतर त्याच्या निवडीचा निर्णय घेतला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत यांना सूर गवसलेला पाहायला मिळाली. मात्र, गोलंदाजांनी निराश केले. विशेषता भुवनेश्वर कुमारने अपेक्षाभंग केलाय.. हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, दीपक चहर यांना डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्यात अपयश आले. ही गोष्ट रोहितलाही सतावतेय...
भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग. राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
सराव सामन्यांचं वेळापत्रक ( Warm-up matches of the Indian team)
- भारत वि. स्थानिक क्लब, १० ऑक्टोबर
- भारत वि. स्थानिक क्लब, १२ ऑक्टोबर
- भारत वि. ऑस्ट्रेलिया, १७ ऑक्टोबर
- भारत वि. न्यूझीलंड, १९ ऑक्टोबर
मुख्य स्पर्धेतील वेळापत्रक
- २३ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
- २७ ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, दुपारी १२.३० वाजल्यापासून, सिडनी
- ३० ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून, पर्थ
- २ नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, दुपारी १.३० वाजल्यापासून, एडलेड
- ६ नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, दुपारी १.३० वाजल्यापासून, मेलबर्न
- १३ नोव्हेंबरला अंतिम सामना
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स, डिस्नी हॉटस्टार
-
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: India's T20 World Cup full schedule and match timing : Warm-up matches of the Indian team ahead of the T20 World Cup, Venue, Live Telecast
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.