India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..

या वर्ल्ड कप स्पर्धेत रिंकू सिंग व शुबमन गिल यांना संधी न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याबाबत अजित आगरकरने त्याचे मत व्यक्त केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 05:58 PM2024-05-02T17:58:13+5:302024-05-02T17:58:39+5:30

whatsapp join usJoin us
India's T20 World Cup Squad Press Conference Live Updates - Ajit Agarkar feels for Rinku Singh and Shubman Gill, he say, "There is absolutely nothing wrong that Rinku or Shubman have done. It's just because of the combination they haven't been in the 15." | India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..

India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India's T20 World Cup Squad Press Conference Live Updates - भारतीय संघ आयसीसी स्पर्धेचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे. संघ जाहीर झाल्यानंतर आज निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दोघांनी पत्रकारांच्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिली.. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवडताना मनात कोणतीच शंका नसल्याचे दोघांनी स्पष्ट केले. या वर्ल्ड कप स्पर्धेत रिंकू सिंग व शुबमन गिल यांना संधी न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याबाबत अजित आगरकरने त्याचे मत व्यक्त केले. 

KL Rahul ला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी का नाही निवडले? अजित आगरकरने स्पष्ट कारण सांगितले


शिवम दुबेबाबत रोहित म्हणाला... 
 "आम्ही संघ निवडताना मधल्या फळीतील चांगल्या हिटरला महत्त्व दिले. असे खेळाडू टॉप ऑर्डरला अधिक मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य देतात. त्यामुळे आम्ही शिवम दुबे सारख्या व्यक्तीची निवड केली जो आमच्यासाठी हे काम करू शकेल. आयपीएलमधील त्याची कामगिरी आणि त्याआधी त्याने राष्ट्रीय संघासाठी केलेली कामगिरी लक्षात ठेवूनच शिवमची निवड केली गेली आहे. पण, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेलच अशी हमी नाही. प्लेइंग इलेव्हन अजून आम्हाला माहित नाही आम्ही तिथे गेल्यावरच ठरवू शकतो,''असे रोहित शर्मा म्हणाला.


रिंकू सिंग व शुबमन गिल यांच्या निवडीबाबत आगरकरचे मत... 
हा आव्हानात्मक निर्णय होता. त्या दोघांची काहीच चूक नाही किंवा त्यांनी काही चुकीचंही केलेलं नाही. पम आम्हाला अंतिम १५ मध्ये अनेक पर्याय हवे होते. अतिरिक्त गोलंदाजाचा पर्यात संघासाठी महत्त्वाचा आहे, असे आम्हाला वाटले. रोहितने सांगितल्या प्रमाणे तेथील खेळपट्टी, परिस्थिती आम्हाला माहित नाही. रिंकूसाठी वाईट वाटतंय, परंतु आम्हाला फक्त १५ खेळाडूंचा संघ निवडायचा होता. ते दोघं राखीव खेळाडूंमध्ये आहेत, बघुया पुढे काय होतंय, असे आगरकर म्हणाला. 

भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद 
 

Web Title: India's T20 World Cup Squad Press Conference Live Updates - Ajit Agarkar feels for Rinku Singh and Shubman Gill, he say, "There is absolutely nothing wrong that Rinku or Shubman have done. It's just because of the combination they haven't been in the 15."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.