India's T20 World Cup Squad Press Conference - KL Rahul ला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी का नाही निवडले? अजित आगरकरने स्पष्ट कारण सांगितले

भारतीय संघ आयसीसी स्पर्धेचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 05:29 PM2024-05-02T17:29:30+5:302024-05-02T17:29:48+5:30

whatsapp join usJoin us
India's T20 World Cup Squad Press Conference Live Updates - Ajit Agarkar says KL Rahul is currently batting at the top and they needed someone who can bat at the top. No doubt KL Rahul is class and Incridible player. | India's T20 World Cup Squad Press Conference - KL Rahul ला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी का नाही निवडले? अजित आगरकरने स्पष्ट कारण सांगितले

India's T20 World Cup Squad Press Conference - KL Rahul ला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी का नाही निवडले? अजित आगरकरने स्पष्ट कारण सांगितले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India's T20 World Cup Squad Press Conference Live Updates - भारतीय संघ आयसीसी स्पर्धेचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याच्या जवळ भारत पोहोचला होता, परंतु ऑस्ट्रेलियाने चतुराईने बाजी मारली. पुन्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अमेरिका व वेस्ट इंडिज इथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केले आहेत आणि त्यांच्यासोबत ४ राखीव खेळाडू जाणार आहेत. संघ जाहीर झाल्यानंतर आज निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली... 


भारताच्या संघात चार फिरकीपटू आहेत आणि तीन जलदगती गोलंदाजांसह दोन अष्टपैलू खेळाडू आहेत.  १ जूनपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व २० संघ पात्र ठरले आहेत आणि पहिला सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यात होईल. २० संघांची प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी केली गेली आहे. चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील आणि सुपर ८मध्ये  ४-४ अशा दोन गटांत संघांची विभागणी होईल. दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील आणि २९ जूनला फायनल खेळवली जाईल. 



अ गटात भारतासह पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका यांचा समावेश आहे. ब गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान हे आहेत. क गटात न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी आणि ड गटात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ हे संघ एकमेकांना भिडतील.

Rohit Sharma Press Conference 
- मी कर्णधार नव्हतो, पुन्हा कर्णधार बनलो... हा आयुष्याचा भाग आहे. मी अनेक कर्णधारांच्या मार्गदर्शनाखाली खेळलो आहे.. एक खेळाडू म्हणून सर्वोत्तम खेळ करण्याचा माझा प्रयत्न आहे..
- लोकेश राहुल हा चांगला फलंदाज आहे... आम्हाला मधल्या फळीत खेळणारा फलंदाज होता आणि लोकेश सध्या सलामीला खेळतोय.. संजू सॅमसन कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणारा फलंदाज आम्हाला हवा होता. रिषभ पंत आणि संजू सॅमसन चांगली कामगिरी करत आहेत आणि ते आमच्यासाठी परफेक्ट आहेत -  अजित आगरकर
 

Web Title: India's T20 World Cup Squad Press Conference Live Updates - Ajit Agarkar says KL Rahul is currently batting at the top and they needed someone who can bat at the top. No doubt KL Rahul is class and Incridible player.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.