India's team update for the West Indies tour : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघ सध्या एका महिन्याच्या विश्रांतीवर आहेत. सततच्या क्रिकेटमुळे भारताचे दिग्गज दमले आहेत आणि त्यामुळे BCCI ने अफगाणिस्ताविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका स्थगित करून त्यांना विश्रांती दिली आहे. पण, पुढील महिन्यात भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे आणि त्यात BCCIने मोठे फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ICC स्पर्धांमध्ये भारताला १० वर्षांपासून जेतेपद पटकावता आलेले नाही आणि आगामी वर्ल्ड कप व २०२४ मध्ये होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून पाऊलं उचलली जात आहेत.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) याचे भारताच्या वन डे व ट्वेंटी-२० संघात पुनरागमन होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या संघात त्याची निवड होणार आहे. RR कर्णधाराला श्रीलंका व न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेला मुकावे लागले होते. त्याला संघात संधी तर दिली जाते, परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी फार कमी मिळते. पण, यंदा तसे होण्याचीही शक्यता कमीच आहे, कारण काही सिनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
संजूने शेवटची ट्वेंटी-२० मॅच ही श्रीलंकेविरुद्ध खेळली होती, परंतु त्यानंतर दुखापतीमुळे त्याने माघार घेतली. आयपीएल २०२३ मध्ये त्याला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने १३ सामन्यांत ३६० धावा केल्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तो चांगली कामगिरी करून संघातील स्थान कायमचे पक्के करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. रिषभ पंत अपघातामुळे वन डे वर्ल्ड कप खेळणार नाही, अशात संजू व इशान किशन हे शर्यतीत आहेत आणि त्यांना अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न असेल. वन डेत लोकेश राहुलच्या दुखापतीमुळे संजूला संधी मिळू शकते.
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात येणार आहे, तर काही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. संजूने ११ वन डे सामन्यांत ३३० धावा केल्या आहेत, तर १७ ट्वेंटी-२०त ३०१ धावा त्याच्या नावावर आहेत.
IND vs WI Scheduleकसोटी मालिकापहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) वन डे मालिकापहिली वन डे - २७ जुलै, बार्बाडोस ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) दुसरी वन डे - २९ जुलै, बार्बाडोस ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) तिसरी वन डे - १ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून)
ट्वेंटी-२० मालिकापहिली ट्वेंटी-२० - ३ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) दुसरी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) तिसरी ट्वेंटी-२० - ८ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) चौथी ट्वेंटी-२० - १२ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) पाचवी ट्वेंटी-२० - १३ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून)