India's team update for the West Indies tour : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ च्या पर्वात भारतीय संघ पहिली कसोटी मालिका वेस्ट इंडिजमध्ये खेळणार आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. मागील आठवड्यात WTC Final मध्ये झालेल्या पराभवानंतरही निवड समिती कसोटी संघात फार बदल करू इच्छीत नाही, परंतु विंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत थोडेफार बदल नक्की पाहायला मिळतील. यामध्ये चेतेश्वर पुजाराची कसोटी संघातून गच्छंती निश्चित मानली जात आहे आणि या ३५ वर्षीय खेळाडूच्या जागी कसोटी संघात युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याला संधी मिळण्याचा अंदाज आहे.
आली रे आली, आता तुझी पाळी आली! संजू सॅमसनचे वन डे, ट्वेंटी-२० संघात होणार पुनरागमन
दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली व अजिंक्य रहाणे या फलंदाजांना संधी मिळणे निश्चित आहे. फक्त चेतेश्वर पुजाराचे स्थान डोलायमान आहे. पुजाराने २०२० पासून २८ कसोटी क्रिकेटमध्ये ५२ डावांत २९.६९च्या सरासरीने धावा केल्या आहेत आणि त्यात केवळ एका शतकाचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाकडून अशी कामगिरी निवड समितीला अपेक्षित नाही. त्याने ११ अर्धशतकं जरी मारली असली तरी त्याची सरासरी ही चिंतेची बाब आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध ९० व १०२* धावांची खेळी केली होती, परंतु बाकीच्या सामन्यांत त्याची बॅट तळपली नाही. WTC Final मध्येही त्याने निराश केले.
कसोटी मालिकापहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, ( वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)