मुंबई : निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद आता भारताचा संघ निवडू शकत नाही, असा मोठा निर्णय बीसीसीआयच्या बैठकीत अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घेतला आहे. त्यामुळे आता ही निवड समिती बरखास्त करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
जुन्या नियमांनुसार निवड समितीचा कार्यकाळ हा चार वर्षांचा होता. आता या निवड समितीची चार वर्षे संपत येत आहेत. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रकरण प्रलंबित आहे. या प्रकरणानुसार निवड समितीचा कार्यकाळ हा पाच वर्षांचाही होऊ शकतो. पण तरीदेखील गांगुली यांनी ही निवड समिती चार वर्षेच काम करेल, असा मोठा निर्णय बीसीसीआयच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
सौरव गांगुलीचा मोठा निर्णय; आता क्रिकेटची लीग करणार बंद
आज झालेल्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत अध्यक्षपदी विराजमान असलेल्या सौरव गांगुलीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मॅच फिक्संग, सट्टेबाजी या वाईट गोष्टींमुळे आता क्रिकेटची लीग बंद करण्याता निर्णय गांगुली यांनी आज घेतला आहे.
आयपीएलमध्ये काही वर्षांपूर्वी स्पॉट फिक्संग घडले होते. या प्रकरणाने क्रिकेटला बट्टा लागला होता. त्यावेळी आयपीएलमधील दोन संघांनाही निलंबित करण्यात आले होते. त्याचबरोबर या प्रकरणातील खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती.
भारताच्या दौऱ्यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याच्यावर सट्टेबाजाशी संपर्क साधल्याप्रकरणी बंदी घातली होती. पण शकिब आणि सट्टेबाज यांचा संपर्क आयपीएलमध्येच आला होता, हेदेखील समोर आले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार आणि क्रिकेटला काळीमा फासणाऱ्या गोष्टी बंद कराव्यात अशी मागणीही करण्यात आली होती.
आयपीएलनंतर कर्नाटक प्रीमिअर लीगही भरवण्यात आली होती. या लीगमध्येही अनैतिक प्रकार घडल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता ही लीग जर खेळवण्यात आली तर ती बंद पाडू, असा इशाराच गांगुली यांनी दिला आहे.
अमित शहा यांचा मुलगा आता बीसीसीआयमधून आयसीसीमध्ये जाणार
भारताचे गृह मंत्री अमित शहा यांचा मुलगा सध्या बीसीसीआयमध्ये आहे. पण यापुढे जय हे आयसीसीमध्ये जाणार आहेत. आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
सध्याच्या घडीला जय हे बीसीसीआयचे सचिव आहेत. जेव्हा बीसीसीआयच्या कार्यकारीणीची निवड होणार होती. त्यावेळी जय हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार, अशी चर्चा होती. पण गांगुली यांना यावेळी अध्यक्षपद देण्यात आले आणि जय यांच्याकडे सचिवपद देण्यात आले.
प्रत्येक क्रिकेट मंडळाचा एक प्रतिनिधी आयसीसीमध्ये पाठवायचा असतो. साधारणत: देशाच्या मंडळाचे अध्यक्ष हे आयसीसीवर जातात, असे पाहिले गेले आहे. पण यावेळी ही जबाबदारी बीसीसीआयने सचिव जय यांच्यावर सोपवली आहे. जय हे बीसीसीआयचे आयसीसीमध्ये प्रतिनिधीत्व करतील. बीसीसीआयच्याकडून आयसीसीच्या बैठकीला जाण्याचा अधिकार त्यांच्याकडे असेल. त्याचबरोबर बीसीसीआयचे म्हणणे ते आयसीसीकडे मांडू शकतील.
आता २०२४पर्यंत बीसीसीआयमध्ये दादागिरी चालणार; आजच्या बैठकीत मोठा निर्णय
बीसीसीआयच्या आज झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षपदाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी २०२४ सालापर्यंत राहू शकतात.
जेव्हा गांगुली यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होता, तेव्हा त्यांचा कार्यकाळ हा ९ महिन्यांचा असेल, असे सांगण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या निर्णयानुसार हा कार्यकाळ ठरवण्यात आला होता. पण हा नियम बदलण्याची मागणी करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयानेही या गोष्टी परवानगी दिल्यामुळे आता सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदी २०२४ सालापर्यंत राहू शकतात.
Web Title: India's team will no longer elect chairman of selection committee; saurav Ganguly's big decision in BCCI meeting
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.