India's tentative World Cup Schedule : १ लाखपेक्षा जास्त क्षमता असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरवन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. BCCI ने तयार केलेल्या २०२३ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाचा ड्राफ्ट आयसीसीकडे पाठवण्यात आला आहे.
बीसीसीआयने वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे पाठवला आहे. तो अन्य सहभागी देशांनाही पाठवण्यात आला आहे आणि त्यानंतर पुढील आठवड्याच्या सुरुवातीला अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल. मसुद्याच्या वेळापत्रकात उपांत्य फेरीच्या ठिकाणांचा उल्लेख नाही. हे उपांत्य फेरीचे सामने १५ व १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जाण्याची शक्यता आहे. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल.
ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार या ड्राफ्टमध्ये भारत त्यांचे लीग सामने नऊ ठिकाणी खेळणार आहे.
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू
लीग टप्प्यात पाकिस्तान पाच ठिकाणी खेळणार आहे. अहमदाबादमधील भारताच्या सामन्याव्यतिरिक्त, हैदराबादमध्ये ६ आणि १२ ऑक्टोबर रोजी क्वालिफायरमधून प्रगती करणाऱ्या दोन संघांविरुद्ध आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया ( २० ऑक्टोबर, बंगळुरू), अफगाणिस्तान ( २३ ऑक्टोबर) आणि दक्षिण आफ्रिका ( २७ ऑक्टोबर) यांच्याविरुद्ध चेन्नईत सामना होईल. बांगलादेश (३१ ऑक्टोबर, कोलकाता), न्यूझीलंड ( ५ नोव्हेंबर, बंगळुरू) आणि इंग्लंड ( १२ नोव्हेंबर, कोलकाता) येथे पाकिस्तानचे सामने होतील.
२९ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, ४ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड आणि १ नोव्हेंबर रोजी पुण्यात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मोठ्या लढती होतील.