साऊदम्पटन : मालिका गमविण्याच्या स्थितीत असलेल्या भारताने शानदार विजयी मुसंडी मारत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील आपले आव्हान कायम राखले. त्याचबरोबर गुरुवारपासून येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजयी लय कायम राखून मालिकेत बरोबरी साधण्याच्या निर्धारासह टीम इंडिया मैदानात उतरेल.
एजबस्टन आणि लॉर्डस्वर दारुण पराभवाचा सामना करणाºया भारताने नॉटिंघमच्या तिसºया कसोटीत २०३ धावांनी विजय मिळवून मालिकेतील चुरस कायम राखली. पाच सामन्यांच्या मालिकेत १-२ अशी माघार झाली असली, तरी आगामी दोन्ही सामने जिंकून भारत ही मालिका ३-२ अशी जिंकू शकतो. त्यासाठी १९३६ मध्ये अशी कामगिरी करणाºया सर डॉन ब्रॅडमन यांच्या आॅस्ट्रेलिया संघाच्या विजयाकडून भारताला प्रेरणा घ्यावी लागेल. या मैदानावर आतापर्यंत तीन कसोटी सामने झाले. २०१४ मध्ये याच मैदानावर भारत इंग्लंडकडून २६६ धावांनी पराभूत झाला होता. सध्याच्या मालिकेत तीन सामन्यात जे ४६ गडी बाद झाले त्यातील ३८ गडी वेगवान गोलंदाजांनी बाद केले. चौथ्या सामन्यात खेळपट्टी हिरवीगार असल्याने पुन्हा वेगवान माºयास पूरक ठरू शकेल.
भारताने तिसऱ्या सामन्यात फलंदाजी व गोलंदाजीत शानदार कामगिरी केल्याने अंतिम एकादशमध्ये बदल होईल, असे दिसत नाही. यामुळे गेल्या ४५ सामन्यात प्रत्येक लढतीसाठी झालेल्या बदलास आळा बसू शकेल. मंगळवारी भारतीय गोलंदाजांनी सरावात बराच घाम गाळला. जसप्रीत बुमराह मात्र सरावात सहभागी नव्हता. उमेश यादव, ईशांत व मोहम्मद शमी यांनी फलंदाजीचा सराव केला.नॉटिंघमच्या शुष्क खेळपट्टीवर बुमराहला लाभ झाला, पण येथील हिरव्यागार खेळपट्टीचा लाभ उमेश यादवला होईल. रविचंद्रन अश्विनच्या तंदुतुस्तीची शंका असल्याने संघात बदल होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. संघ व्यवस्थापनाकडून कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. अश्विन न खेळल्यास करुण नायरला संधी मिळेल.
इंग्लंडसाठी जॉनी बेयरेस्टोची तंदुरुस्ती चिंतेचा विषय आहे. बेन स्टोकने डाव्या पायाच्या गुडघ्यावर पट्टी बांधली होती. त्याने दुसºया स्लिपमध्ये झेलचा सराव केला. गोलंदाज म्हणून त्याच्या तंदुरुस्तीबाबत व्यवस्थापन चिंतेत आहे. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स यानेही सराव केला नाही. इंग्लंडची मुख्य चिंता आघाडीच्या फळीचे अपयश आहे.(वृत्तसंस्था)सामना: दुपारी ३.३० पासून भारतीय वेळेनुसारभारत: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन,पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, करुण नायर, हार्दिक पांड्या ,रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, ईशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.इंग्लंड: ज्यो रूट (कर्णधार) , अॅलिस्टर कूक, कीटोन जेनिंग्स, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, आॅलिव्हर पोप, मोईन अली, आदिल राशीद, सॅम कुरेन, जेम्स अॅन्डरसन, स्टुअर्ट ब्रॉड, क्रिस वोक्स, बेन स्टोक्स, जेम्स विस.