भारतीय संघात मिळेना संधी अजिंक्य रहाणेने निवडली वेगळी वाट; IPL नंतर परदेशात खेळणार

जानेवारी २०२२ पासून भारतीय संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) महत्त्वाच्या निर्णय घेतला आहे. कसोटी संघातून वगळल्यानंतर अजिंक्यने रणजी करंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 06:59 PM2023-01-31T18:59:04+5:302023-01-31T18:59:17+5:30

whatsapp join usJoin us
India's Test veteran, Ajinkya Rahane, set to join English County, Leicestershire for the upcoming County Championship season and the One-Day Cup | भारतीय संघात मिळेना संधी अजिंक्य रहाणेने निवडली वेगळी वाट; IPL नंतर परदेशात खेळणार

भारतीय संघात मिळेना संधी अजिंक्य रहाणेने निवडली वेगळी वाट; IPL नंतर परदेशात खेळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जानेवारी २०२२ पासून भारतीय संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) महत्त्वाच्या निर्णय घेतला आहे. कसोटी संघातून वगळल्यानंतर अजिंक्यने रणजी करंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली. मुंबईला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले असले तरी त्याने ७ सामन्यांत ५७.६३च्या सरासरीने ६३४ धावा केल्या. त्यात दोन शतकांचा समावेश होता. भारतीय संघ ९ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे आणि चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला. पण, त्यात अजिंक्यची नाव नव्हते आणि उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याची निवड होण्याची शक्यता कमीच आहे. सर्फराज खान, सूर्यकुमार यादव प्रबळ दावेदार आहेत. 

भारतीय संघाचा कसोटीपटू अजिंक्य रहाणे आता इंग्लीश कौटी अजिंक्यपद स्पर्धेत लेईसेस्टरशायर ( Leicestershire ) क्लबकडून खेळणार आहे. कौंटी अजिंक्यपद आणि वन डे चषक स्पर्धेत तो या क्लबचे प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वीही अजिंक्य कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळला होता. २०१८मध्ये त्याने हॅम्पशायर क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. आता तो एका वर्षासाठी लेईसेस्टरशायर क्लबकडून खेळणार आहे. ३४ वर्षीय अजिंक्यच्या समावेशामुळे लेईसेस्टरशायर क्लबची फलंदाजी मजबूत झाली आहे. 


इंडियन प्रीमिअर लीगच्या यंदाच्या पर्वानंतर अजिंक्य इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. ११ जूनला लेईसेस्टरशायरचा पहिला सामना ग्ल्युसेस्टरशायर क्लबविरुद्ध होणार आहे. अजिंक्यने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४७.१२ च्या सरासरीने १२,८६५ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये ४०च्या सरासरीने त्याने ६३१७ धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये खेळलेल्या १५ कसोटी सामन्यात त्याला २३.६१च्या सरासरीने ३०७ धावा करता आल्या. लेईसेस्टरशायर क्लबमध्ये अजिंक्यसोबत अफगाणिस्तानचा नवीन-उल-हक व दक्षिण आफ्रिकेचा विआना मुल्डर खेळणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: India's Test veteran, Ajinkya Rahane, set to join English County, Leicestershire for the upcoming County Championship season and the One-Day Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.