दुबई : भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान डावावर राहील, पण एक सामना अनिर्णीत राखला तरी भारताला अव्वल स्थानाचा बचाव करता येईल. आॅस्ट्रेलिया सध्या क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे.आयसीसीने स्पष्ट केले, ‘आॅस्ट्रेलियाने जर ४-० ने विजय मिळवला तर त्यांना कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावता येईल. भारताला अव्वल स्थान कायम राखण्यासाठी केवळ एक सामना अनिर्णीत राखण्याची गरज आहे.’अव्वल २० फलंदाजांच्या क्रमवारीत कुठलाही बदल झालेला नाही. त्यात भारतीय कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी आहे. आॅस्ट्रेलियाचा निलंबित फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन अनुक्रमे दुसऱ्या व तिसºया स्थानी आहेत. गोलंदाजांमध्ये रवींद्र जडेजा पाचव्या स्थानासह अव्वल भारतीय गोलंदाज आहे. रविचंद्रन आश्विन सातव्या स्थानी कायम आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात गुरुवारी अॅडिलेडमध्ये होणार अहे. भारताचे सध्या ११६ तर आॅस्ट्रेलियाचे १०२ मानांकन अंक आहेत. आयसीसीने स्पष्ट केले की, ‘१४ मानांकन गुणांचा फरक म्हणजे भारत सहज मालिका जिंकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जर यात भारत अपयशी ठरला तर मानांकन गुण गमावावे लागतील.’ भारताने जर ४-० ने विजय मिळवला तर भारताच्या खात्यावर १२० मानांकन गुणांची नोंद होईल तर आॅस्ट्रेलियाचे केवळ ९७ मानांकन गुण राहतील. जर आॅस्ट्रेलियाने ४-० ने विजय मिळवला तर ११० मानांकन गुणांसह त्यांना अव्वल स्थान गाठता येईल तर भारताची तिसºया स्थानी घसरण होईल. आॅस्ट्रेलियाने ३-० ने विजय मिळवला तर कोहलीच्या संघाचे १०९ मानांकन गुण होतील तर यजमान संघाच्या खात्यावर १०८ मानांकन गुणांची नोंद राहील.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे अव्वल स्थान डावावर
आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे अव्वल स्थान डावावर
भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान डावावर राहील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:33 AM