चॅम्पियन्स ट्राॅफी : भारताचे पाकिस्तानविरुद्ध पारडे जड! पारंपरिक प्रतिस्पर्धी आज दुबईच्या मैदानात भिडणार

पाकसाठी भारताविरुद्धचा आज रविवारी होणारा सामना ‘करा किंवा मरा’ असाच असेल. यजमान हरले तर थेट स्पर्धेबाहेर होतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 05:46 IST2025-02-23T05:46:34+5:302025-02-23T05:46:43+5:30

whatsapp join usJoin us
India's tough match against Pakistan! The traditional rivals will clash in Dubai today | चॅम्पियन्स ट्राॅफी : भारताचे पाकिस्तानविरुद्ध पारडे जड! पारंपरिक प्रतिस्पर्धी आज दुबईच्या मैदानात भिडणार

चॅम्पियन्स ट्राॅफी : भारताचे पाकिस्तानविरुद्ध पारडे जड! पारंपरिक प्रतिस्पर्धी आज दुबईच्या मैदानात भिडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यात नेहमी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते. १९८०-९० च्या दशकातील खुन्नस अलीकडे काहीशी कमी झाल्यासारखी वाटते. पाकिस्तान संघ कमकुवत होणे हे यामागील मोठे कारण आहे. 
भारताविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी पाककडे प्रतिभावान खेळाडू नाहीत. जे आहेत त्यांच्यात दडपण झुगारण्याची क्षमता दिसत नाही. पाकसाठी भारताविरुद्धचा आज रविवारी होणारा सामना ‘करा किंवा मरा’ असाच असेल. यजमान हरले तर थेट स्पर्धेबाहेर होतील.

भारताने गाजवले वर्चस्व...
वनडे सामन्यांच्या दोन्ही संघांच्या निकालांवर नजर टाकल्यास पाकिस्तानने ७३ तर भारताने ५७ सामने जिंकले. १९७०च्या दशकात उभय संघांत सामने व्हायचे तेव्हा पाक संघ भारताला नेहमी हरवायचा. त्यामुळेच त्यांच्या विजयाचे आकडे जास्त आहेत. मग खेळात भारतीय हावी झाले. पाकवर सतत विजय मिळवीत गेले.  पाकिस्तानने भारताविरुद्ध सर्वांत मोठा विजय २०१७ला चॅम्पियन्स ट्रॉफीतच मिळविला होता.

भारताची बाजू भक्कम
आठ वर्षांनंतर दोन्ही संघ पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीत भिडणार आहेत. मागच्या निकालांची तुलना केल्यास पारडे भारताच्या बाजूने झुकलेले आहे. पाकच्या अडचणी अगणित आहेत. त्यामुळेच भारत या सामन्यात भक्कम असेल. समीकरणे भारताच्या बाजूने आहेत. क्रिकेटमध्ये अखेरच्या क्षणी काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही. विशेषत: पांढऱ्या चेंडूच्या खेळात अनेकदा ‘अपसेट’ घडले.

गुडघे टेकले नाहीत...
मागच्या तीन वर्षांत  पांढऱ्या चेंडूवर भारतीयांची कामगिरी कमकुवत राहिली, असे म्हणता येणार नाही.  टीम इंडिया वेळोवेळी पराभूत झाली; पण नतमस्तक होण्यासारखी संघाची कामगिरी नव्हती. पराभवातही संघर्ष होता. 
दुसरीकडे, पाकिस्तान संघाने प्रतिस्पर्धी संघांपुढे गुडघे टेकले.  काहीही असले तरी भारतीय संघ पाकिस्तानला सहज लेखण्याची चूक करणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठलाही संघ मागच्या रेकॉर्डच्या भरवशावर विसंबून राहू शकत नाही. क्रिकेटच्या खेळात पहिली चूक अखेरचीही ठरू शकते.

...खेळपट्टी पारखून रणनीती
शनिवारी उपकर्णधार शुभमन माध्यमांपुढे आला तेव्हा म्हणाला की, आम्ही गाफील राहणार नाही. अखेर सामना ५०-५० षटकांचा आहे. त्याआधी खेळपट्टीचा वेध घेऊ. नंतर फलंदाजीची रणनीती ठरवू. 
आधी फलंदाजी केल्यास ३२०-३३० धावा आव्हानात्मक ठरू शकतील. यानंतर पाकवर दडपण आणता येईल. 
पाकिस्तानने आधी फलंदाजी केल्यास खेळपट्टीवर ३०० धावा निघणार असतील तर आम्ही त्यांना २७०-२८० पर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करू. दुबईची खेळपट्टी संथ असल्याने फिरकीपटू वर्चस्व गाजवितात.

भारत भक्कम का?
भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये. मायदेशात वनडे मालिकेत इंग्लंडला क्लीन स्वीप दिला.
फलंदाजांची मोठी फळी. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या अष्टपैलूंचा संघात समावेश.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केल्याने आत्मविश्वास दुणावलेला.
सलामीवीर शुभमन गिल कमाल फॉर्मात. गेल्या चार डावांमध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावलेली आहेत.

रोहित शर्माने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले.
कोहली विशेष कामगिरी करू शकला नसला तरी तो कधीही मोठी खेळी करू शकतो.
श्रेयस अय्यरने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मधल्या फळीत फलंदाजीला येऊन भरपूर धावा केल्या.
गोलंदाजही फॉर्ममध्ये. मोहम्मद शमीने बांगलादेशविरुद्ध पाच बळी घेतले. इतर गोलंदाजांचीही प्रभावी कामगिरी.

मोफत पास मिळणार नाही...
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कुणालाही मोफत पास न देण्याचा निर्णय पीसीबीने घेतला. पाकमध्ये आंतरराष्ट्रीय सामना असेल तर मीडिया, शासकीय अधिकारी, व्हीआयपी आणि प्रायोजकांना मोफत पास दिला जात होता. 
यंदा मात्र पीसीबीचे पाहुणे आणि प्रायोजकांसाठी काहीच तिकिटे राखीव ठेवण्यात आली. आयसीसीचे आयोजन असल्याने एकही मोफत पास उपलब्ध नसल्याचे पीसीबीने म्हटले आहे. 
या निर्णयामुळे अनेक जण हिरमुसले आहेत. मात्र, पीसीबीला या कठोर निर्णयामुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

पाक कमकुवत का?
मायदेशात झालेली त्रिकोणी मालिका जिंकण्यात पाक अपयशी. अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातही पुन्हा न्यूझीलंडकडून पराभव.
मुख्य फलंदाज खास करून बाबर आझम विशेष फॉर्मात नाही. फखर झमान दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर.
गोलंदाजीत शाहिन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ फक्त कागदावर भक्कम वाटतात. स्ट्राइक रेट आणि इकॉनॉमीत सगळेच सामान्य.

Web Title: India's tough match against Pakistan! The traditional rivals will clash in Dubai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.