Join us  

मोठी बातमी : भारताचा न्यूझीलंड दौरा २०२२पर्यंत रद्द, समोर आलं महत्त्वाचं कारण 

आयसीसीच्या फ्यूचर टूअर प्रोगामनुसार विराट कोहली अँड कंपनी वर्ल्ड कप सुपर लीग क्वालीफाय करण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध तीन वनड सामने खेळायचे आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:53 PM

Open in App

भारतीय संघाचा प्रस्तावित न्यूझीलंड दौरा पुढील वर्षांपर्यंत रद्द करण्यात आला आहे. आयसीसीच्या फ्यूचर टूअर प्रोगामनुसार विराट कोहली अँड कंपनी वर्ल्ड कप सुपर लीग क्वालीफाय करण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध तीन वनड सामने खेळायचे आहेत. पण, कोरोना व्हायरसमुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं ही मालिका रद्द केली. किवी बोर्डांनी अनेक मालिका रद्द केल्या आहेत आणि त्यामुळ अनेक संघ न्यूझीलंड दौरा करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्याव्यतिरिक्त न्यूझीलंड संघ पुढील वर्षी बांगलादेश, नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका आणि महिला वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे. आता भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२नंतरच न्यूझीलंड दौऱ्यावर जाऊ शकते.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर एक दिवसही टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहायचे नाही; रवी शास्त्री यांनी स्पष्ट केली भूमिका 

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. फ्यूचर टूअर प्रोग्रामनुसार भारताचा न्यूझीलंड दौरा होणार नाही आणि तो पुढील वर्षी नोव्हेंबरनंतरच होईल. या कालावधीत न्यूझीलंडचा संघही नोव्हेंबरपर्यंत विविध देशांच्या दौऱ्यावर असणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या पाकिस्तानात मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी दाखल झाला आहे. त्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी यूएईत दाखल होईल आणि नंतर भारत दौऱ्यावर येईल.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर किवी संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे आणि तेथेच तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळेल. 

 

CSKचा प्रमुख शिलेदार CPL २०२१ जेतेपद जिंकून दुबईत दाखल, किरॉन पोलार्डच्या विक्रमाशी बरोबरी

त्यानंतर मायदेशात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी व तीन ट्वेंटी-२०, नेदरलँड्सविरुद्ध तीन वन डे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळेल. बांगलादेश व दक्षिण आफ्रिका विरुद्धची कसोटी मालिका ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडबीसीसीआयट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App