India’s Tour of South Africa - दक्षिण आफ्रिका मालिकेतून भारताच्या खेळाडूंच्या माघारीचे सत्र सुरूच आहे. दीपक चहरने वडिंलांच्या प्रकृतीमुळे ट्वेंटी-२० व वन डे मालिकेतून माघार घेतली, तर मोहम्मद शमी वेळेत दुखापतीतून बरा न झाल्याने कसोटी मालिकेत खेळणार नाही. बीसीसीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे. भारत - द. आफ्रिका यांच्यात पहिली कसोटी २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे होईल. त्याआधी भारतीय खेळाडू २० डिसेंबरपासून आपसांत सराव सामना खेळतील. शमी सध्या स्वत:च्या घरी दुखण्यावर उपचार घेत आहे. तो इंग्लंडविरुद्ध २५ जानेवारीपासून हैदराबाद येथे सुरू होणाऱ्या स्थानिक कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकतो. भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन ( Ishan Kishan) याने वैयक्तिक कारणास्तव कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. बीसीसीआयकडे त्याने तशी विनंती केली होती आणि त्याची ही विनंती मान्य केली गेली आहे. इशान किशनच्या जागी यष्टिरक्षक केएस भरत याची बदली खेळाडू म्हणून निवड केली गेली आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, लोकेश राहुल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत ( India’s squad for Tests: Rohit Sharma (C), Shubman Gill, Yashasvi Jaiswal, Virat Kohli, Shreyas Iyer, Ruturaj Gaikwad, KL Rahul (wk), Ravichandran Ashwin, Ravindra Jadeja, Shardul Thakur, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Jasprit Bumrah (VC), Prasidh Krishna, KS Bharat (wk) )