Join us  

भारताला इंग्लंडविरुद्ध विजयाचा दिलासा

भारतीय महिला संघाने गुरुवारी फिरकीपटूंच्या चमकदार कामगिरीनंतर सलामीवीर स्मृती मानधनाच्या आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 4:26 AM

Open in App

मुंबई : भारतीय महिला संघाने गुरुवारी फिरकीपटूंच्या चमकदार कामगिरीनंतर सलामीवीर स्मृती मानधनाच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर महिला टी-२० तिरंगी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ८ गडी राखून दिलासा देणाऱ्या विजयाची नोंद केली.भारताने इंग्लंडचा डाव केवळ १०७ धावात गुंडाळला आणि ४.२ षटके शिल्लक राखत विजय साकारला. स्मृतीने ४१ चेंडूंना सामोरे जाताना आक्रमक नाबाद ६२ धावांची खेळी केली.इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी एकूण ९ फलंदाजांना माघारी परतवले. आॅफ स्पिनर अनुजा पाटीलने तीन तर राधा यादव, दीप्ती शर्मा व पुनम यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.या सामन्याच्या निकालाचा स्पर्धेवर कुठलाही प्रभाव पडणार नाही. कारण सुरुवातीचे तीन सामने गमाविणारा भारतीय संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. भारताला आॅस्ट्रेलियाविरुद्ध दोनदा तर इंग्लंडविरुद्ध एकदा पराभव स्वीकारावा लागला.स्मृतीने दुसºया षटकात कॅट जॉर्जच्या गोलंदाजीवर तीन चौकार ठोकत आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर तिने चौथ्या षटकात दोन चौकार लगावले.मिताली राज (६) व जेमिमा रोड्रिगेज (७) झटपट माघारी परतल्या, पण स्मृतीने इंग्लंडच्या गोलंदाजांना समर्थपणे तोंड दिले. वैयक्तिक १३ धावांवर असताना स्मृती सुदैवी ठरली. स्मृतीचे या स्पर्धेतील हे तिसरे अर्धशतक आहे. तिने आजच्या खेळीत ८ चौकार व १ षटकार लगावला. स्मृती व हरमनप्रीतन कौर (नाबाद २०) यांनी विजय निश्चित केला. या दोघींनी तिसºया विकेटसाठी ६० धावांची अभेद्य भागीदारी केली.त्याआधी, भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडला स्थिरावू दिले नाही. अनुजाने २१ धावांत ३ बळी घेतले. राधा यादव (२-१६), पूनम यादव (२-१७) व दीप्ती शर्मा (२-२४) यांची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. इंग्लंडतर्फे सलामीवीर डॅनियली वाटने ३१ तर एमी जोंस व नताली स्किवरने प्रत्येकी १५ धावा केल्या. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या संघांदरम्यान अंतिम लढत शनिवारी खेळली जाणार आहे.इंग्लंड महिला : १८.५ षटकात सर्वबाद १०७ धावा (डॅनियली व्याट ३१, अ‍ॅमी जोन्स १५, नताली स्किव्हर १५; अनुजा पाटील ३/२१, राधा यादव २/१६, पूनम यादव २/१७, दीप्ती शर्मा २/२४) पराभूत वि. भारत महिला : १५.४ षटकात २ बाद १०८ धावा (स्मृती मानधना नाबाद ६२, हरमनप्रीत कौर नाबाद २०; डॅनियली हेझल २/१७).