सेंच्युरियन : पहिल्या कसोटीप्रमाणे दुसºया कसोटीच्या तिस-या दिवशीही पावसाचा व्यत्यय आल्याने भारत - दक्षिण आफ्रिका दरम्यान सुरु असलेला कसोटी सामना निर्धारीत वेळेआधी थांबविण्यात आला. खेळ पुन्हा सुरु झाल्यानंतर यजमानांनी दुसºया डावात तिसºया दिवसअखेर २ बाद ९० अशी मजल मारली होती आणि त्यांच्याकडे आता एकूण ११८ धावांची आघाडी आहे. डिव्हिलियर्स नाबाद ५०, तर डीन एल्गर नाबाद ३६ धावांवर खेळत आहेत.
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने उभारलेल्या ३३५ धावांचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव ३०७ धावांमध्ये संपुष्टात आला. कर्णधार कोहलीच्या (१५३) तडाखेबंद दीडशतकाच्या जोरावर भारतावरील मोठ्या आघाडीचे संकट टळले. तरी, यजमानांनी २८ धावांची नाममात्र आघाडी घेत वर्चस्व मिळवले. यानंतर दुसºया डावात फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकेची सुरुवात मात्र अडखळती झाली. जसप्रीत बुमराहने भेदक माºयाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला दोन धक्के दिले.
बुमराहने नव्या चेंडूने शानदार मारा केला. सुपरस्पोर्ट पार्कच्या खेळपट्टीवर चेंडूला आतापासूनच कमी उसळी मिळत आहे. त्याने एडेन मार्कराम (१) व हाशिम अमला (१०) या दोघांना तीन षटकांच्या अंतरात तंबूचा मार्ग दाखवित दक्षिण आफ्रिकेची २ बाद ३ अशी अवस्था केली. रविचंद्रन अश्विनने गोलंदाजीची सुरुवात केली तर ईशांत शर्माने पहिला बदली गोलंदाज म्हणून जबाबदारी सांभाळली. मात्र, एबी आणि एल्गर यांनी ८७ धावांची नाबाद भागीदारी करत भारताला पुढील यशापासून वंचित ठेवले. एबीने ७८ चेंडूत ६ चौकारांसह नाबाद अर्धशतक झळकावले. एल्गरने ७८ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद ३६ धावा फटकावल्या.
त्याआधी, कोहलीने दीडशतकी खेळी करीत भारताचा डाव सावरला. त्याने २१७ चेंडूंना सामोरे जाताना १५ चौकारांसह १५३ धावांचा तडाखा दिला. भारताने सोमवारी ५ बाद १८३ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. कोहली व हार्दिक पांड्या (१५) यांनी सहाव्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. कोहलीने १४६ चेंडूंमध्ये १० चौकारांसह २१ वे कसोटी शतक झळकावले. कोहलीला दुसºया टोकाकडून योग्य साथ लाभली नाही. पांड्या धावबाद झाला. अश्विनने ५४ चेंडूंना सामोरे जाताना ३८ धावा केल्या. त्याला वर्नोन फिलँडरने बाद केले. कोहली व अश्विनने ६२ चेंडूंमध्ये ५० धावांची भागीदारी केली. त्यानंतरच्या षटकात मोर्नी मोर्कलने मोहम्मद शमीला बाद केले. कोहलीने ईशांतचा (३) बचाव करण्याचा पूर्ण प्रयत्न
केला. विराट व ईशांत यांनी नवव्या विकेटसाठी २५ धावांची भागीदारी केली. मोर्ने मोर्कलने (४-६०) ईशांतला आखूड टप्प्याच्या माºयावर बाद केले. त्यानंतर दोन षटकांनी कोहलीला लाँग आॅनला झेल देण्यास भाग पाडत भारताचा डाव गुंडाळला. (वृत्तसंस्था)
धावफलक :
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ३३५. भारत पहिला डाव :- मुरली विजय झे. डिकाक गो. महाराज ४६, के.एल. राहुल झे. व गो. मोर्कल १०, चेतेश्वर पुजारा धावबाद ००, विराट कोहली झे. डिव्हिलियर्स गो. मोर्कल १५३, रोहित शर्मा पायचित गो. रबाडा १०, पार्थिव पटेल झे. डिकाक गो. एनगिडी १९, हार्दिक पांड्या धावबाद १५, रविचंद्रन अश्विन झे. ड्यूप्लेसिस गो. फिलँडर ३८, मोहम्मद शमी झे. अमला गो. मोर्कल ०१, ईशांत शर्मा झे. मार्कराम गो. मोर्कल ०३, जसप्रीत बुमराह नाबाद ००. अवांतर (१२). एकूण ९२.१ षटकांत सर्वबाद ३०७. गोलंदाजी : महाराज २०-१-६७-१, मोर्कल २२.१-५-६०-४, फिलँडर १६-३-४६-१, रबाडा २०-१-७४-१, एनगिडी १४-२-५१-१.
दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : एडेन मार्करम पायचीत गो. बुमराह १, डीन एल्गर खेळत आहे ३६, हाशिम आमला पायचीत गो. बुमराह १, एबी डिव्हिलियर्स खेळत आहे ५०. अवांतर - २. एकूण : २९ षटकात २ बाद ९० धावा. गोलंदाजी : रविचंद्रन आश्विन १२-०-३३-०; जसप्रीत बुमराह ८-२-३०-२; इशांत शर्मा ४-०-१४-०; मोहम्मद शमी ५-१-१२-०.
सेंच्युरियनमध्ये शतक
ठोकणारा कोहली पहिला विदेशी कर्णधार ठरला.
यापूर्वी येथे प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने २०१० साली सर्वाधिक ९० धावांची खेळी क्रेली. होती.
दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा कोहली दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
यापूर्वी १९९७ मध्ये सचिन तेंडुलकरने कर्णधार म्हणून केपटाऊनमध्ये शतक
झळकावले होते.
दक्षिण आफ्रिकेत कोहलीचे हे दुसरे कसोटी शतक असून तेंडुलकरने येथे पाच कसोटी शतक ठोकले आहेत.
Web Title: India's Virat's comeback, South Africa's 118-run lead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.