- अयाज मेमन भारताच्या दिग्विजयाला आज ४० वर्षे पूर्ण झाली. २५ जून १९८३ या दिवशी वेस्ट इंडीजची जागतिक क्रिकेटमधली मक्तेदारी संपुष्टात आणत कपिल देवच्या भारतीय क्रिकेट संघाने लॉर्डस् मैदानावर विश्वचषक उंचावला. संपूर्ण क्रिकेट विश्वाला कलाटणी देणारा हा क्षण होता, कारण, यानंतर जागतिक क्रिकेटमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्या व्यतिरिक्त एका नव्या महाशक्तीने जन्म घेतला. १९८३च्या या विश्वविजयाने केवळ अंतिम सामन्याआधी खिसे खाली होण्याची वेळ आली होती भारतीयच नाही, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयामही बदलून टाकले होते. या विजेतेपदामुळे नव्या संघांमध्ये आत्मविश्वास फुंकला गेला. त्यामुळे पुढे पाकिस्तान आणि श्रीलंकेसारखे संघही जगज्जेते ठरले. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातला अंतिम सामना आतापर्यंत अनेक रूपांनी आपल्या नजरेखालून गेलेला आहे. पण हा सामना 'याची देही याची 'डोळा' ज्यांनी पाहिला त्या अयाझ मेमन यांनी त्यावेळी आलेल्या अनुभवाचे कथन केलेले आहे. हे किस्से आजपर्यंत कधीही ऐकायला मिळालेले नाहीत. त्यामुळे आज विश्वविजयाच्या चाळिसाव्या वर्षपूर्तीनिमित्ताने त्यांनी सांगितलेले तेव्हाचे किस्से त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे-
आठवणी अजूनही ताज्याभारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजयाच्या आठवणी मी कधीच विसरु शकणार नाही. कारण, असे क्षण आपल्या आयुष्यात फार कमी वेळा येत असतात. फक्त माझ्याच कशाला, तर खेळाडूच्या आयुष्यातील तो एक सुवर्णक्षण होता. त्यामुळेच आजही भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला तेव्हाचा एक-एक क्षण तंतोतत आठवतो. २५ जून १९८३ या दिवशी केवळ ६ भारतीय पत्रकार तो सामना कव्हर करत होते. मी त्यापैकी एक होतो याचा मला आजही तेवढाच अभिमान आहे.
टर्निंग पॉइंटकपिल देवची १७५ धावाची खेळीच १९८३च्या विश्वचषकातला प्रमुख टर्निंग पॉइंट होता. कारण, त्यानंतर भारतीय संघाने कात टाकली. पुढे बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला दिमाखात पराभूत करत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला. भारताने घेतलेल्या या फिनिक्स भरारीचे संपूर्ण श्रेय कपिलच्या इनिंगलाच जाते.
मीडिया वॉरमुळे इंग्लंड फेव्हरिटपहिले दोन विश्वचषक जिंकलेला वेस्ट इंडीज अंतिम फेरी गाठेल, यात कुणालाही शंका नव्हती. पण, त्याच्यासोबत दुसरा संघ कोणता याबाबत माध्यम क्षेत्रामध्ये वाद चालायचा. विश्वचषक मायदेशातच असल्याने इंग्लंड संघच ते स्थान प्राप्त करू शकतो, अशी हवा तयार करण्यात आली होती. दुसरीकडे, संपूर्ण इंग्लिश मीडिया भारताला कधीही जिंकू न शकणारा संघ म्हणून कायम हिनवायचा, त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूही प्रचंड नाराज झाले होते. प्रसिद्ध पत्रकार डेव्हीड फ्रीथची कहाणी तर आपल्या सगळ्यांनाच माहीतच आहे. भारत जर विश्वचषक जिंकला तर माझे शब्द मी खाऊन टाकेल, अशी घोषणा त्यांनी केली होती. मैदानाबाहेरील या घटनांचा नकारात्मक परिणाम कपिलने संघावर होऊ दिला नाही. त्यामुळे ओल्ड फोर्डवर विजयाचा चंग बांधून उतरलेल्या भारतीय संघाने सर्वांच्या फेव्हरिट इंग्लंडला सेमिफायनलमध्ये धूळ चारली.
अंतिम सामन्याआधी खिसे खाली होण्याची वेळ आली होतीलंडनमध्ये दिवस काढणे कधीही स्वस्त नसते. त्या काळीही सुदैवाने माझी राहण्याची व्यवस्था सर्बिटनला माझ्या एक मित्राकडे झाली होती. मात्र, सर्बिटन ते लॉर्ड्स हे अंतर मोठे होते. अंतिम सामन्याला उशीर नको म्हणून मी लवकर निघण्याचा निर्णय घेतला आणि एक चूक केली. इंग्लडमध्ये सहसा काळ्या टॅक्सीने जाणे म्हणजे स्वतःचे खिसे खाली करण्याचा प्रकार आहे. मी त्याला बळी पडलो. स्टेडियमला पोहोचलो तोपर्यंत सुनील गावसकर बाद झाला होता.
गर्दीमुळे १०० मीटर अंतर गाठायला लागले २ तासत्या काळी प्रुडेन्शियल या स्पर्धेच्या प्रायोजकाकडून अंतिम सामन्यानंतर लगेच एक मोठी पार्टी ठेवण्यात आली होती. मीसुद्धा तिथे होतो.
वेंगसकर, संदीप पाटील, कीर्ती आझाद हे माझ्याच वयाचे असल्याने आमच्या गप्पा सुरू होत्या. पण, मला अजूनही आठवतं की, वेस्ट इंडीजकडून फक्त डेसमंड हेन्स आणि मायकल होल्डिंग हे दोघेच त्या पार्टीला आले. त्यानी भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले.
-सामन्यानंतर भारतीय चाहते स्टेडियमबाहेर जमा झाले होते. त्यामुळे स्टेडियम से अवध्या १०० मीटरवर असलेले भारताचे वेस्ट मॉलैंड हॉटेल हे अंतर गाठायला तब्बल २ तास लागले. २०० मीटरचे अंतर १०० किलोमीटरप्रमाणे भासत होते.
रिची बॅनोंनी दिली ६६ पौंडची ऑफरस्टेडियमला पोहोचल्यानंतर मी घाईघाईत प्रेस बॉक्सकडे जायला लागलो. लॉर्ड्सचा प्रेस बॉक्स चौथ्या मजल्यावर असल्याने मी पटापट पायऱ्या चढायला लागलो. यादरम्यान मला माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक रिची बनो भेटले त्यांनी मला विश्वचषक सुरु होण्यापूर्वी आणि पायऱ्यांवर भेटल्यावरसुद्धा एक गोष्ट सांगितली की, भारत जर जिंकला तर १ पौंडला ६६ पॉड मिळतील, मी तुला ही ऑफर द्यायला तयार आहे. हा किस्सा यासाठी की त्यावेळी भारत १०० टक्के पराभूत होणार याच भ्रमात संपूर्ण जग होते. पण, भारतीय संघाने या सर्वांना तोंडात बोटे घालायला लावले.
आणि तो कपिलचा मॅचटनिंग कैचभारताने १८३ धावा फलकावर लावल्यानंतर वेस्ट इंडीज अवघ्या काही षटकांमध्ये हे लक्ष्य गाठेल, असा अंदाज बाधला गेला. पण, बलविंदर संधूच्या बनाना इनस्विंगरते गॉर्डन ग्रिनिजची दांड़ी गुल केली आणि भारतीय पाठराख्यामध्ये उत्साह संचारला, मात्र, त्यानंतर विव्ह रिचर्ड्स नावाचे वादळ लॉर्ड्सवर घोंघावायला लागले आणि भारतीय चाहते कोशात गेले. चौकारांची झडी बरसवल्यानंतर व्हिव्ह रिचर्ड्सने मदनलालला पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रत्यत्न केला. पण जसा १७५ च्या खेळीने कपिलने विश्वचषकाचा नूर बदलला, अगदी तसाच रिचर्ड्सचा अवघड झेल २५ ते ३० यार्ड धावत भारताच्या या देवाने पकडला. यानंतर वेस्ट इंडीयन काही काळ सुन्न झाले. स्टेडियममध्ये भारतीयाच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. कपिलचा हा झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
विजेतेपद फ्लूक नव्हते- १९८३ च्या विश्वविजयाआधी भारतीय संघाने केवळ एकच सामना विश्वचषकात जिंकला होता. तोही दुबळ्या ईस्ट आफ्रिकेविरुद्ध. पण, या विजेतेपदानंतर २ वर्षाच्या आता याच संघाने शारजात आशिया चषक, ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि शारजात रॉथमन्स कप जिंकला. त्यामुळे हे विश्वविजेतपद फ्लूक म्हणजे अनवधानाने मिळाले. नव्हते. हे भारतीय संघाने सिद्ध केले. १९८३ च्या विश्वचषकाने केवळ भारताचाच नाही, जागतिक क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला.