माऊंट माऊंगानुई : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर आघाडीच्या फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव करीत सलग तिसऱ्या वन-डेमध्ये विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने या निकालासह विश्वकप स्पर्धेपूर्वी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला आहे.आॅस्ट्रेलिया दौºयात ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने गेल्या दहा वर्षांत न्यूझीलंडमध्ये प्रथमच मालिका विजय साकारला आहे. यापूर्वी भारताने २००९ पासून येथे एकमेव वन-डे मालिका खेळली होती आणि त्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. गेल्या वर्षभरात विदेशात दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियानंतर भारताचा हा तिसरा विजय आहे.भारताने आज सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय साकारला. गोलंदाजांनी प्रथम ४९ षटकांमध्ये न्यूझीलंडचा डाव २४३ धावांत गुंडाळला. टीव्ही शोमध्ये महिलाविरोधी वक्तव्य केल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेल्या हार्दिक पांड्याचा पुनरागमनानंतर हा पहिला सामना होता. त्याने १० षटकांत ४५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले.भारतासाठी हा विजय एकतर्फी ठरला. त्यात कर्णधार विराट कोहलीने ७४ चेंडूंना सामोरे जाताना ६० आणि उपकर्णधार रोहित शर्माने ७७ चेंडूंमध्ये ६२ धावा केल्या. या दोघांनी दुसºया विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. भारताने ४३ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात २४५ धावा करीत विजय मिळवला.संथ खेळपट्टीमुळे दोन्ही फलंदाजांना सहज फटके लगावता येत नव्हते, पण त्यांनी संधी मिळताच चेंडूला सीमारेषा दाखविली. शिखर धवनला (२८) आज मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर रोहित व कोहली यांनी शतकी भागीदारी केली. कारकिर्दीतील ३९ वे अर्धशतक झळकावणाºया रोहितला सँटनरने तंबूचा मार्ग दाखविला. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार व २ षटकार लगावले. वन-डेमध्ये ४९ वे अर्धशतक ठोकणाºया कोहलीच्या डावात ६ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. तो बोल्टच्या गोलंदाजीवर निकोल्सकडे झेल देत माघारी परतला. त्यानंतर दिनेश कार्तिक (३८ चेंडूंमध्ये ३८ धावा) आणि अंबाती रायुडू (४२ चेंडूंमध्ये ४० धावा) यांनी संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७७ धावांची अभेद्य भागीदारी केली. त्याआधी, न्यूझीलंडच्या फलंदाजांना संथ खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजीला सामोरे जाण्यात अडचण भासली. रॉस टेलर (१०६ चेंडूंमध्ये ९३ धावा) आणि टॉम लाथम (६४ चेंडूंमध्ये ५१ धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या ११९ धावांच्या भागीदारीचा अपवाद वगळता न्यूझीलंडतर्फे अन्य कुठली मोठी भागीदारी झाली नाही. भारतातर्फे मोहम्मद शमीने ९ षटकांत ४१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. शमीने विश्वकप स्पर्धेसाठी तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून संघातील स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. त्याने कॉलिन मुन्रो (७) याला बाद करीत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला.१९ व्या वर्षी मी शुभमनच्या १० टक्केही नव्हतो : कोहलीशुभमन गिलला नेट््समध्ये फलंदाजी करताना बघितल्यानंतर आपण १९ व्या वर्षी या फलंदाजाच्या तुलनेत १० टक्केही नव्हतो, असे मला वाटल्याचे भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोमवारी सांगितले.कोहली म्हणाला, ‘काही असाधारण प्रतिभा प्रकाशझोतात येत आहेत. पृथ्वी शॉने मिळालेल्या संधीचा (वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी) लाभ घेतल्याचे तुम्ही बघितले आहे. शुभमनमध्ये प्रतिभा आहे. नेट््समध्ये त्याला फलंदाजी करताना बघितल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. ज्यावेळी मी १९ वर्षांचा होतो त्यावेळी मी त्याच्या १० टक्केही नव्हतो. त्याचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्याचा स्तर उंचावत राहिला तर भारतीय क्रिकेटला त्याचा मोठा लाभ होईल. संघात येणारे खेळाडू सुरुवातीपासून छाप सोडतात. त्यांना संधी देणे व त्यांचा विकास होण्यासाठी मदत केल्यामुळे खुशी होते.’ शुभमन अंडर-१९ विश्वकप जिंकणाºया भारतीय संघाचा सदस्य होता. त्याने गेल्या वर्षी आयसीसीच्या या स्पर्धेत तिसºया क्रमांकावर फलंदाजी करताना ४१८ धावा केल्या होत्या. स्पर्धेत तो सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. भारताविरुद्ध तिसºया वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यातील पराभवानंतर मालिका गमावणाºया न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सन निराश होता. भारताचा बलाढ्य संघ आम्हाला पाच सामन्यांच्या मालिकेत क्रिकेटचे धडे देत आहे, असेही विल्यम्सन म्हणाला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- न्यूझीलंडविरुद्ध भारताची विजयी आघाडी
न्यूझीलंडविरुद्ध भारताची विजयी आघाडी
विजयाच्या हॅट्ट्रिकसह न्यूझीलंडमध्ये १० वर्षांनंतर मालिकेत सरशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 5:45 AM