लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : दुखापती या खेळाडूंच्या पाचवीला पुजलेल्या असतात. खेळाडूंना दुखापत कधीही होऊ शकते. या दुखापतींनंतर त्यांचे आयुष्य कसे असेल, याबाबत सांगणे कठीण असते. असाच एक भारताचा युवा वेगवान गोलंदाज गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. सध्या त्याच्यावर वेळ आली आहे ती कुबड्या घेऊन चालण्याची.
हा युवा गोलंदाज आयपीएलमध्येही खेळला. अगदी अखेरच्या सामन्यातही त्याने भेदक मारा केला. पण त्यानंतर मात्र तो दिसला तो थेट कुबड्यांचा आधार घेऊन चालताना.
भारतीय संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. भारताला पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडकडून पराबव पत्करावा लागला. त्यानंतर आता दुसऱ्या सराव सामन्यासाठी भारतीय संघ तयारी करणार आहे. पण दुसऱ्या सामन्याला जाण्यापूर्वी भारतीय संघाने या युवा गोलंदाजाची आवर्जुन भेट घेतली. त्यावेळी हा युवा गोलंदाज कुबड्यांच्या मदतीने चालत होता. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर त्याचा कुबड्या घेऊन चालत असणारा फोटो पोस्ट केला आहे.
आयपीएमध्ये या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील अंतिम सामन्यातही त्याने तिखट मारा केला. त्याचबरोबर चेन्नईचा विजयही त्याच्याच हातामध्ये होता. कारण लसिथ मलिंगाचा शेवटचा चेंडू हा खेळाडू खेळला आणि त्रिफळाचीत झाल्यामुळे चेन्नईला पराभव पत्करावा लागला. आता तुम्हाला कळून चुकले असेल की, हा युवा वेगवान गोलंदाज आहे शार्दुल ठाकूर.
विराट कोहली भारतीय खेळाडूंशीही आक्रमकपणे वागतो का?... शार्दुल ठाकूरची विशेष मुलाखतमैदानात विराट कोहली फार आक्रमक दिसतो. काही प्रसंगी तो प्रतिस्पर्धी खेळाडूंना धारेवरही धरतो. कधीकधी तर अपशब्दही वापरताना दिसतो. पण तो संघातील खेळाडूंशीही तसाच वागतो का, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दैाऱ्यानंतर भारतात परतलेला मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने खास मुलाखतीमध्ये कोहलीच्या स्वभावाविषयही भाष्य केले आहे.
तू आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळू शकत नाही, अशी त्याची निंदा काही जणांनी केली होती. पण भारताच्या संघात स्थान मिळवून दमदार कामगिरी करत मुंबईच्या शार्दुल ठाकूरने टीकाकारांचे दात घशात टाकले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात शार्दुलने लक्षवेधी कामगिरी केली आणि आता श्रीलंकेतील तिरंगी मालिकेसाठी तो सज्ज झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना संघात क्रिकेट कल्चर चांगलेच समृद्ध झाले आहे, असे मत शार्दुलने व्यक्त केले आहे.
ध्याच्या घडीला प्रत्येक देश खेळामध्ये व्यावसायिक झाले आहे. प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच ते मैदानात उतरत असतात. भारतीय संघाचेही तसेच आहे. पण जर पराभव झाला किंवा एखाद्या खेळाडूकडून चांगली कामगिरी झाली नाही, तर कुणीही रागावत नाही. उलट पराभवाची कारणमीमांसा केली जाते. जर एखाद्या खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही, तर त्याच्याशी संवाद साधला जातो. त्याचा आत्मविश्वास वाढवला जातो, असं शार्दुल सांगत होता.
या दैाऱ्यावर जाण्यापूर्वी शार्दुल हा दुखापतग्रस्त झाला होता. दुखापतीतून सावरल्यावर शार्दुलने मुंबईत कसून सराव केला. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या दैाऱ्यात त्याला नेट्समध्ये सराव करत असताना मुख्य प्रशिक्षक रवी शस्त्री यांनीही काही टिप्स दिल्या. त्यांच्या मैालिक मार्गदर्शनाचा चांगला फायदा झाल्याचेही शार्दुलने सांगितले. त्याचबरोबर मैदानात महेंद्रसिंग धोनी जे मार्गदर्शन करतो, हे फार महत्वाचे असते, असेही शार्दुलने सांगितले.
कोहलीच्या स्वभावाविषयी शार्दुल म्हणाला की, मैदानावर आक्रमक झालेला कोहली साऱ्यांनीच पाहिला आहे. पण तो संघातील खेळाडूंशी मात्र कधीही तसा वागत नाही. संघातील प्रत्येक खेळाडूला तो समजून घेतो. त्याला आत्मविश्वास देतो. स्वत:हून प्रत्येक सामन्यात दमदार कमगिरी करत संघातील अन्य खेळाडूंपुढे कर्णधार कसा असावा, याचा आदर्श निर्माण करतो.
आगामी तिरंगी मालिका ही युवा खेळाडूंना चांगली संधी असल्याचे शार्दुलला वाटते. याबाबत तो म्हणाला की, तिरंगी मालिकेत संघातील काही वरीष्ठ खेळाडूंनी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना या मालिकेत चमक दाखवण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे युवा खेळाडूंनी या संधीचे सोने करायला हवे.