कोलंबो : भारताचा युवा (19 - वर्षांखालील ) संघ सध्या दमदार कामगिरी करत आहे. भारताच्या युवा संघाने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात 613 धावांचा डोंगर उभारला. हा धावांचा डोंगर उभारताना भारताचा युवा फलंदाज पवन शाहने या सामन्यात एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारताच्या युवा संघानेही पहिला डाव 618 या धावसंख्येवर घोषित करत सर्वाधिक धावांचा विक्रम केला आहे. यापूर्वी भारताच्या युवा संघाने 2006 साली पाकिस्तानविरुद्ध खेळताना 611 धावा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास 12 वर्षांनी हा विक्रम मोडीत काढला आहे.
भारताच्या पवननेही या सामन्यात 282 धावांची दमदार खेळी साकारली आहे. भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. यापूर्वी भारताच्या तन्यम श्रीवास्तवच्या (220) नावावर हा विक्रम होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पवनने दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लिंटन पीइकच्या (नाबाद304) नावावर सर्वाधिक धावा आहेत.