ICC World Cup 2019 : दोन्ही सलामीविरांचे 'गोल्डन डक'; वन डे क्रिकेटमध्ये केवळ तिसऱ्यांदा

७ मे २००६ या दिवशी पहिल्यांदा हा पराक्रम पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 07:47 PM2019-06-22T19:47:57+5:302019-06-22T19:54:07+5:30

whatsapp join usJoin us
INDICC World Cup 2019: 'Golden Duck' for both openers; Only third time in ODIs | ICC World Cup 2019 : दोन्ही सलामीविरांचे 'गोल्डन डक'; वन डे क्रिकेटमध्ये केवळ तिसऱ्यांदा

ICC World Cup 2019 : दोन्ही सलामीविरांचे 'गोल्डन डक'; वन डे क्रिकेटमध्ये केवळ तिसऱ्यांदा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ललित झांबरे : वेस्ट इंडिजचा जलद गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याने शनिवारी न्यूझीलंडचे दोन्ही सलामी फलंदाज, मार्टीन गुप्तील व कॉलीन मुन्रो यांना शुन्यावरच बाद केले. त्यातही विशेष म्हणजे हे दोन्ही फलंदाज आपल्या पहिल्याच चेंडूवर बाद झाले. याप्रकारे न्यूझीलंडच्या दोन्ही सलामी फलंदाजांना 'गोल्डन डक' मिळाले. वन डे क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही सलामीविरांना 'गोल्डन डक' मिळण्याची ही केवळ तिसरीच वेळ आहे.

यापूर्वी ७ मे २००६ या दिवशी वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फिडेल एडवर्ड्सने पहिल्यांदा हा पराक्रम केला होता. त्यानंतर श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये २२ फेब्रुवारी २०१५ या दिवशी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी दुसऱ्यांदा हा पराक्रम केला होता.

बाद फलंदाज-   पिएट रिंके            थिरूमाने                   मार्टिंन गुप्तील
                     टेरी डफीन           तिलकरत्ने                 कॉलीन मुन्रो
गोलंदाज-        फिडेल एडवर्डस्       दौलत झाद्रान             शेल्डन कॉट्रेल
                    -----------------        शपूर झाद्रान               ---------------
सामना-           झिम्बाब्वे- वे.इं.     श्रीलंका- अफगाण         न्यूझी.-वे.इ.
ठिकाण-          जॉर्जटाऊन            ड्युनेडीन                 मँचेस्टर
दिनांक-           ७ मे २००६            २२ फेब्रु. २०१५         २२ जून २०१९

 

Web Title: INDICC World Cup 2019: 'Golden Duck' for both openers; Only third time in ODIs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.