इंडोनेशियाची महिला क्रिकेटपटू रोहमालिया ( Rohmalia ) हिने मंगोलियाविरुद्धच्या पाचव्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात विश्वविक्रमी कामगिरी केली. रोहमालियाने तिच्या ३.२ षटकांत एकही धाव न देता ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे तिने ३ षटकं निर्धाव फेकली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही फॉरमॅटमध्ये ( पुरुष किंवा महिला) असा पराक्रम करणारी रोहमालिया ही जगातील पहिली गोलंदाज ठरली आहे. तिच्या उल्लेखनीय गोलंदाजीमुळे मंगोलियाचा संपूर्ण संघ १६.२ षटकांत २४ धावांत तंबूत परतला. यापैकी १० धावा या अतिरिक्त होत्या. इंडोनेशियाने हा सामना १२७ धावांनी जिंकला. मंगोलियाचे सहा फलंदाज शून्यावर बाद झाले, तर कर्णधार त्सेंडरसन एरियुत्सेत्सेगने सर्वाधिक ७ धावा केल्या. इंडोनेशियाकडून नी पुतू आयू नंदा साकारिनीने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली आणि संघाला ५ बाद १५१ धावांपर्यंत पोहोचवले.
7/1 - केथ डॅबेंग्वाझ ( वेस्टर्न्स), २००६ ( पुरुष प्रथम श्रेणी) 7/1 - जॅनेट बर्गर्झा ( आमला), १९६६ ( महिला प्रथम श्रेणी) 7/1 - इस्टर मॅबोफानाझ ( ईगल्स), २०२२( महिला ट्वेंटी-२०)