Join us  

IND vs PAK : शतकासह साजरा करणार का अंबाती रायुडू आपला वाढदिवस...

आतापर्यंत रायुडूला आशिया चषकामध्ये मोठी खेळी साकारता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 5:02 PM

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायुडूचा आज वाढदिवस आहे.

दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान : भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायुडूचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध शतक ठोकून तो आनंद साजरा करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

आतापर्यंत रायुडूला आशिया चषकामध्ये मोठी खेळी साकारता आलेली नाही. पुनरागमन करत असताना त्याला भारतीय संघाने तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवले आहे. पण तरीही त्याला अजून छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही तर कदाचित त्याला संघातून बाहेर जावे लागेल. त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे.

टॅग्स :आशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तान