नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमनेसामने आहेत. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बहुचर्चित सामन्यासाठी क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांचे लक्ष लागले आहे. अशातच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील या खास सामन्यासाठी खास तयारी केली आहे. तसेच मी फक्त संध्याकाळच्या निकालाच्या बातम्यांची वाट पाहत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सामन्याच्या पूर्वसंध्येला आनंद महिंद्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे की, नेहमीप्रमाणे, मी #indiaVsPakistan सामन्यासाठी तयार आहे. अँटी-जिंक्स स्प्रेने स्वत:ला झाकून घेतले आहे आणि माझा अँटी-स्ट्रेस बॉल आहे आणि माझ्या बाजूला काळजीचे मणी आहेत. तसेच माझा टीव्ही देखील आता बंद झाला आहे. मी फक्त संध्याकाळच्या निकालाच्या बातम्यांची वाट पाहत आहे. एकूणच आनंद महिंद्रा यांनी सामन्याची उत्सुकता सांगितली आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ आज ७ फलंदाज, एक अष्टपैलू व तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरत असल्याचे रोहितने सांगितले. पण, प्रत्यक्ष संघ पाहिल्यास पाच फलंदाज, १ अष्टपैलू, २ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज संघात दिसत आहेत.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, हैदर अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहिन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ,
Web Title: Industrialist Anand Mahindra has made special preparation for today's match IND vs PAK
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.