19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला यशस्वी जैस्वालच्या ८८ धावांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशपुढे १७८ धावांचे आव्हान ठेवता आले.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. बांगलादेशने सुरुवातीपासून भारताला धक्के द्यायला सुरुवात केली. बांगलादेशने सातत्याने भारताला धक्के दिले, त्यामुळेच भारतालाच या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताला एकामागून एक धक्के बसत असताना फक्त यशस्वी जैस्वालने दमदार फलंदाजी केली आणि संघाला सन्मानजक धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. जैस्वालने आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८८ धावांची खेळी साकारली.
सर्व कामं बाजूला सारून शास्त्री आणि कोहली फायनल बघायला बसले...19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ बांगलादेशबरोबर दोन हात करत आहेत. पण भारतीय सिनिअर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आपल्या टीमबरोबर मॅच पाहायला बसले आहेत. शास्त्री आणि भारतीय संघाचा सामना पाहतानाचा फोटो आता चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे.
सचिन तेंडुलकरने दिल्या भारतीय संघाला खास शुभेच्छा19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा संघ बांगलादेशबरोबर दोन हात करत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाला माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने खास शुभेच्छा दिल्या आहेत.
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दहा विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर आज भारतीय संघ विश्वचषक पटकावण्यासाठी बांगलादेशबरोबर दोन हात करत आहे.
विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी सचिनने भारतीय संघाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनबरोबरच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहाय्यक प्रशिक्षक आणि भारतीय संघातील काही खेळाडूंनीही भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय संघाला शुभेच्छा देताना सचिन म्हणाला की, " युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या भारतीय संघाला माझ्याकडून शुभेच्छा. भारतीय संघाने यापूर्वीही चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यातही तुम्ही चांगली कामगिरी करा आणि विश्वचषक जिंका."