Join us

INDvBAN, U19CWCFinal : भारताला 'ही' मोठी चूक भोवली आणि विश्वचषक हातातून निसटला

या सामन्यात भारतीय संघाला एक मोठी चूक भोवल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळेच भारताला विश्वचषक गमवावा लागला. बांगलादेशने जिंकलेला हा पहिला युवा विश्वचषक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 21:52 IST

Open in App

आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020 : युवा (१९-वर्षांखालील) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेर बांगलादेशनेभारतावर विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या होत्या. बांगलादेशच्या संघाला या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला, पण अखेर त्यांनीच डकवर्थ-लुईस नियमांनुसार विजय साकारला. या सामन्यात भारतीय संघाला एक मोठी चूक भोवल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळेच भारताला विश्वचषक गमवावा लागला. बांगलादेशने जिंकलेला हा पहिला युवा विश्वचषक आहे.

भारताच्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली होती. बांगलादेशच्या सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी रचली होती. पण रवी बिश्णोईने यावेळी मॅजिक स्पेल टाकला आणि चक्क चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. रवीच्या या स्पेलने सामन्याचे रुप बदलले. त्यानंतर सुशांत मिश्राने दोन बळी मिळवले आणि बांगलादेशची बिनबाद ५० वरून ६ बाद १०२ अशी अवस्था झाली. पण त्यानंतर कर्णधार अकबर अली आणि परवेझ हुसेन इमॉन यांनी चांगली भागीदारी रचली आणि सामना पुन्हा बांगलादेशच्या बाजूने झुकला.

अकबर आणि परवेझ यांची भागीदारी रंगत होती. पण यावेळी भारताचा कर्णधार प्रियांक गर्गने यशस्वीच्या हातात चेंडू सुपूर्द केला. यशस्वीने यावेळी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला आणि परवेझच्या रुपात संघाला मोठे यश मिळवून दिले. परवेझने सात चौकारांच्या जोरावर ४७ धावा केल्या. ही जोडी फुटल्यावर सामना दोलायमान अवस्थेत होता. कारण कर्णधार अकबर हा सावधपणे फलंदाजी करत बांगलादेशला विजयासमीप घेऊन जात होता.

या सामन्यात भारताने बांगलादेशपुढे फार मोठे आव्हान ठेवले नव्हते. त्यामुळे भारताला अचूक गोलंदाजी करायची होती. पण या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी २९ अवांतर धावा दिल्या आणि ही चूक त्यांना चांगलाच भोवली. कारण भारताने या सामन्यात तब्बल २९ अवांतर धावा बांगलादेशला आंदण दिल्या.

19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला यशस्वी जैस्वालच्या ८८ धावांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशपुढे १७८ धावांचे आव्हान ठेवता आले.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. बांगलादेशने सुरुवातीपासून भारताला धक्के द्यायला सुरुवात केली. बांगलादेशने सातत्याने भारताला धक्के दिले, त्यामुळेच भारतालाच या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

भारताला एकामागून एक धक्के बसत असताना फक्त यशस्वी जैस्वालने दमदार फलंदाजी केली आणि संघाला सन्मानजक धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. जैस्वालने आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८८ धावांची खेळी साकारली.

टॅग्स :आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020बांगलादेशभारत