INDvsTHAI Asia Cup : भारतीय महिलांचा 'आठवा'वा प्रताप! फायनलमध्ये धडक, Deepti Sharma ने मोडला पाकिस्तानी स्टारचा विक्रम

India vs Thailand Women's Asia Cup 2022 : भारतीय महिला संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 11:26 AM2022-10-13T11:26:18+5:302022-10-13T11:26:52+5:30

whatsapp join usJoin us
INDvsTHAI Asia Cup : India qualified into the final for the 8th consecutive time in Women's Asia Cup history, beat Thailand  by 74 runs, Deepti Sharma took Most wickets in an edition of Women's T20 Asia Cup | INDvsTHAI Asia Cup : भारतीय महिलांचा 'आठवा'वा प्रताप! फायनलमध्ये धडक, Deepti Sharma ने मोडला पाकिस्तानी स्टारचा विक्रम

INDvsTHAI Asia Cup : भारतीय महिलांचा 'आठवा'वा प्रताप! फायनलमध्ये धडक, Deepti Sharma ने मोडला पाकिस्तानी स्टारचा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Thailand Women's Asia Cup 2022 : भारतीय महिला संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला. प्रथमच आशिया चषकाची उपांत्य फेरी खेळणाऱ्या थायलंड महिला संघावर हरमनप्रीत कौर व टीमने विजय मिळवला. भारताने सर्वाधिक सहा वेळा आशिया चषक उंचावल आहे आणि यंदा जेतेपदाच्या सामन्यात त्यांच्यासमोर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या विजेत्याचे आव्हान असणार आहे. भारतीय महिलांनी सलग आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.  

छोटा पॉकेट शफाली वर्माने दमदार खेळी केली. तिने सृती मानधनासह ( १३) पहिल्या विकेटसाठी ३८ धावा जोडल्या आणि त्यानंतर जेमिमा रॉड्रीक्ससह ( २७) चांगला खेळ केला. शफालीने २८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४२ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३० चेंडूंत ३६ धावा केल्या. पूजा वस्त्राकरच्या नाबाद १७ धावांनी भारताला ६ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारून दिली. थायलंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना भारताच्या धावगतीला लगाम लावली. सोर्नारिन  तिप्पोचने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 


भारतीय गोलंदाजांसमोर थायलंडच्या खेळाडूंचा फार निभाव लागला नाही. दीप्ती शर्माने ४ षटकांत ७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आणि १ निर्धाव षटकही फेकले. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत दीप्तीच्या नावावर सर्वाधिक १३ विकेट्स झाल्या आहेत आणि महिला आशिया चषक ट्वेंटी-२०त एका पर्वात सर्वाधिक १२ विकेट्सचा साना मिर ( २०१६) या पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम दीप्तीने मोडला. भारताच्या राजेश्वरी गायकवाडने दोन विकेट्स घेतल्या. थायलंडकडून कर्णधार नारुईमोल चाईवाई ( २१) व नताया बूचाथाम ( २१) यांनी संघर्ष केला. थायलंडला ९ बाद ७४ धावाच करता आल्या आणि भारताने ७४ धावांनी हा सामना जिंकला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: INDvsTHAI Asia Cup : India qualified into the final for the 8th consecutive time in Women's Asia Cup history, beat Thailand  by 74 runs, Deepti Sharma took Most wickets in an edition of Women's T20 Asia Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.