मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकांसाठी भारताचे संघ आज जाहीर करण्यात आले आहेत. या संघात भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे कमबॅक झाले आहे. पण महेंद्रसिंग धोनी आणि मयांक अगरवाल यांना या संघात स्थान मिळेल, अशी चर्चा होती. पण ही चर्चा अखेर फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या केदार जाधवचे या संघात पुनरागमन झाल्याचेही पाहायला मिळत आहे.
कोलकाता येथे निवड समिती, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांच्या संघ निवडीबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री दिसत नव्हते.
बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारतात तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या दौऱ्याला 6 डिसेंबर पासून ट्वेंटी-20 सामन्यानं सुरुवात होणार आहे. पहिला ट्वेंटी-20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पण, मुंबई पोलिसांनी या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास अडचण होईल, असे सांगितले आहे. 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्यामुळे मुंबईतील बहुतेक पोलीस त्या ड्युटीवर असणार आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्या इतके पोलीस मुंबई पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे.
विंडीज मालिकेचे वेळापत्रक
ट्वेंटी-20 मालिका
6 डिसेंबर - मुंबई
8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम
11 डिसेंबर - हैदराबाद
वन डे मालिका
15 डिसेंबर- चेन्नई
18 डिसेंबर- विशाखापट्टणम
22 डिसेंबर - कट्टक
Web Title: INDvWI: Indian team announced for series against West Indies; See who got the chance...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.