भारताच्या पोरींनी कमाल केली! कसोटीत ६२ वर्षानंतर प्रथमच अशी विकेट पडली, Video 

INDW vs AUS W : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात आजपासून कसोटी सामन्याला सुरुवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 06:57 PM2023-12-21T18:57:05+5:302023-12-21T18:57:59+5:30

whatsapp join usJoin us
INDW vs AUS W : Australia's Phoebe Litchfield becomes first woman opening batter in 62 years run out for a diamond duck in Test cricket | भारताच्या पोरींनी कमाल केली! कसोटीत ६२ वर्षानंतर प्रथमच अशी विकेट पडली, Video 

भारताच्या पोरींनी कमाल केली! कसोटीत ६२ वर्षानंतर प्रथमच अशी विकेट पडली, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

INDW vs AUS W  (Marathi News)  : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात आजपासून कसोटी सामन्याला सुरुवात झाली. पूजा वस्त्राकर ( ४-५३), स्नेह राणा ( ३-५६) व दीप्ती शर्मा ( २-४५) यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ धावांवर गडगडला. भारतीय महिलांनी पहिल्या दिवसअखेर १ बाद ९८ धावांचे प्रत्युत्तर दिले. शफाली वर्मा ( ४०) ने स्फोटक सुरुवात करून दिली. स्मृती मानधना ४३ धावांवर नाबाद आहे. पण, या सामन्यात कसोटी क्रिकेट इतिहासात ६२ वर्षांत जे कधीच घडले नव्हते ते घडले..


ऑस्ट्रेलियाचा महिला संघ ३९ वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी आला. कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्यांच्या ओपनर्सकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. पण घडले उलटेच. बेथ मूनी व फोएबे लिचफिल्ड ( Phoebe Litchfield )  यांची जोडी पहिल्याच षटकात तुटली. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लिचफिल्ड डायमंड डकवर ( एकही चेंडूचा सामना न करता) रन आऊट झाली. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शून्यावर धावबाद होणारी ती चौथी सलामीवीर आणि १९६१ नंतरची पहिली फलंदाज ठरली.


इंग्लंडची मेरी टेलर १९३७  मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्यावर बाद होणारी पहिली महिला खेळाडू ठरली होती. दोन दशकांनंतर न्यूझीलंडची जॉयस पॉवेल ( वि. इंग्लंड) आणि ऑस्ट्रेलियासाठी १९६१ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात किट रेमंड अशा पद्धतीने बाद झाली होती.  रेणुका सिंग ठाकूरने टाकलेल्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लिचफिल्ड बाद झाली. एक धाव घेण्यासाठी लिचफिल्ड पळाली, परंतु जेमिमा रॉड्रिग्जने चपळाईने चेंडू टिपला आणि यष्टिरक्षक यास्तिका भाटियाकडे फेकला. तिने लगेच बेल्स उडवल्या आणि लिचफिल्ड रन आऊट झाली.  


या कसोटीपूर्वी लिचफील्ड चर्चेत होती कारण तिला गुजरात जायंट्सने महिला प्रीमियर लीग (WPL) २०२४ मिनी-लिलावात १ कोटी रुपयांना आपल्या संघासाठी निवडले होते. अवघ्या पाच T20 सामन्यांमध्ये तिने  तीन डावांत ९९ धावा केल्या आणि तिच्या 220 च्या स्ट्राईक रेटने अनेकांना प्रभावित केले आहे.

Web Title: INDW vs AUS W : Australia's Phoebe Litchfield becomes first woman opening batter in 62 years run out for a diamond duck in Test cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.