Join us  

INDW vs AUSW: भारतीय कर्णधाराचा खराब फटका; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या कॅचनं जिंकलं हर'मन'

indw vs ausw 1st odI: आज भारतीय महिला संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला वन डे सामना खेळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 2:42 PM

Open in App

INDW vs AUSW 1st ODI Live । मुंबई : ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ त्यांच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणासाठी देखील ओळखला जातो. याचाच प्रत्यय सध्या सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान आला. आजपासून भारतीय महिला संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला सुरूवातीलाच तीन मोठे धक्के बसले. शेफाली वर्मा (१), रिचा घोष (२१)  बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरला (९) बाद करण्यात पाहुण्या संघाला यश आले. आज टीम इंडिया उपकर्णधार स्मृती मानधनाच्या अनुपस्थित मैदानात आहे. आजच्या सामन्यातून साइका इशाक भारतीय संघात पदार्पण करत आहे. 

हरमनप्रीत कौर एक खराब फटका मारून बाद झाली. श गार्डनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेली हरमन फसली अन् बाद झाली. खरं तर कॅच डार्सी हिने अप्रतिम झेल घेऊन भारतीय कर्णधाराला बाहेरचा रस्ता दाखवला. 

जच्या सामन्यासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया, रिचा घोष, स्नेह राणा, अनजोत कौर, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, साइका इशाक, रेणुका सिंग. 

दरम्यान, अलीकडेच टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात पराभूत केले. त्यामुळे साहजिकच हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला. पण, कांगारूंनी अनेकदा मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाला पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आपला विजयरथ कायम ठेवण्याचे आव्हान भारतासमोर असेल. वन डे मालिकेनंतर भारतीय संघ नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाहरनमप्रीत कौरभारतीय महिला क्रिकेट संघ