मुंबई : सध्या भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यात कांगारूच्या संघाने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली होती. मात्र कांगारूच्या संघाने जोरदार पुनरागमन करून तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 5 सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.
दरम्यान, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाच्या कामगिरीवर भाष्य केले. हरमनप्रीत कौरने आपल्या गोलंदाजांची स्तुती करत एक मोठे विधान केले आहे. "भारताकडे पूर्णवेळ गोलंदाजी प्रशिक्षक नाही कारण रमेश पोवार यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये हलवण्यात आले. तर हृषिकेश कानिटकर यांना फलंदाजीचे प्रशिक्षक बनवण्यात आले. दक्षिण आफ्रिकेत दोन महिन्यांनी ट्वेंटी-20 विश्वचषक होणार आहे."
हरमप्रीत कौरने व्यक्त केली खदखद हरमनप्रीत म्हणाली, "आम्हाला गोलंदाजी प्रशिक्षकाची उणीव भासत आहे पण आमचे गोलंदाज चांगले खेळत आहेत. ते सराव सत्राला उपस्थित राहून त्यांची जबाबदारी समजून घेतात. या सामन्यात त्यांनी स्वतःच रणनीती बनवली. मी त्यांना मैदानावर फक्त साथ देत होते." अशा शब्दांत हरमनप्रीत कौरने भारतीय महिला संघाला गोलंदाजीच्या प्रशिक्षकाची गरज असल्याचे म्हटले.
ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल.
नेट गोलंदाज - मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर, सिमरन बहादूर.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक
- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 9 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 11 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 14 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 17 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 20 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"