harmanpreet kaur and alyssa healy । नवी मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाला पुन्हा एकदा मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्धची ट्वेंटी-२० मालिका गमवावी लागली. सलामीच्या सामन्यात मोठा विजय मिळवल्यानंतर भारताच्या विजयाची गाडी रूळावरून घसरली. अॅलिसा हिलीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेतील शेवटचे दोन सामने जिंकून विजय साकारला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला तिच्या तापट स्वभावासाठी ओळखले जाते. याचा प्रत्यय देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात पाहायला मिळाला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यातील या घटनेबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने सावध प्रतिक्रिया दिली. अॅलिसा ही ऑस्ट्रेलियाच्या पुरूष संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी आहे. कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताला वन डे मालिकेत ०-३ आणि ट्वेंटी-२० मध्ये १-२ असा पराभव स्वीकारावा लागला.
ऑस्ट्रेलियाने तिसरा ट्वेंटी-२० सामना ७ विकेट राखून जिंकल्यानंतर अॅलिसा हिलीने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. यावेळी तिने हरमनप्रीत आणि तिच्यातील संघर्षाबद्दलही भाष्य केले. हरमनप्रीतबद्दलच्या वादावर प्रश्न केला असता हिलीने म्हटले, "मी एवढेच सांगेन की आम्ही केवळ क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी आहोत." खरं तर अॅलिसा फलंदाजी करत असताना हरमनने तिच्या चेंडूने फेकला होता.
कांगारूंचा विजयरथ कायमअॅलिसाने सांगितले की, आम्ही दोघी वेगवेगळ्या पद्धतीने कर्णधारपद सांभाळतो. माझ्याकडून शत्रूत्व असे काहीच नाही. मी यष्टीच्या मागे खूप आक्रमक असते आणि जर तुम्हाला यापद्धतीने सामना करायचा असेल तर त्यासाठी तयार राहावे लागेल. बांगलादेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे आणि भारतात पुढच्या वर्षी ५० षटकांच्या विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. त्यासाठी आमची तयारी सुरू आहे.
ऑस्ट्रेलियाचा २-१ ने विजय तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील दोन सामने जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियाने २-१ ने मालिका खिशात घातली. पहिला सामना जिंकण्यात यजमानांना यश आले असले तरी अखेरचे दोन सामने जिंकून कांगारूंनी शेवट गोड केला. मंगळवारी झालेल्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ विकेट राखून मोठा विजय मिळवला.