Harmanpreet Kaur | नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत भारतीय महिला ऑस्ट्रेलियाविरूद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहेत. मात्र, या बहुचर्चित सामन्यापूर्वीच भारताच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी असल्यामुळे ती खेळणार का नाही याबाबत संभ्रम आहे. त्यात संघाची वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकरला इन्फेक्शनमुळे आजच्या सामन्यातून वगळण्यात आले आहे.
दरम्यान, पूजा वस्त्राकरच्या जागी स्नेह राणा हिचा भारताच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर न खेळल्यास स्मृती मानधना नेतृत्व करताना दिसेल. ऑस्ट्रेलिया सलग तिसरा ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. हरमनप्रीतच्या जागी हरलीन देओलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. हरमनप्रीतने चार सामन्यांत केवळ 66 धावाच केल्या आहेत, परंतु महत्त्वाच्या सामन्यात तिचे असणे प्रतिस्पर्धींवर दडपण निर्माण करण्यासारखे आहे. पूजा वस्त्राकरने आतापर्यंत या स्पर्धेत दोन बळी घेतले आहेत, परंतु रेणुका सिंगसह तिने प्रतिस्पर्धींची डोकेदुखी वाढवून ठेवलेली दिसली.
उपांत्य फेरीतील सामने
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - गुरूवारी, सायंकाळी 6.30 वाजल्यापासून
इंग्लंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका - शुक्रवार, सायंकाळी 6.30 वाजल्यापासून
भारतीय महिला संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), यस्तिका भाटिया, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग, स्मृती मानधना, शिखा पांडे, देविका वैद्य, अंजली सरवाणी.
ऑस्ट्रेलिया महिला संघ - मेग लॅनिंग (कर्णधार), अॅलिसा हिली, डी'आर्सी ब्राउन, अॅशले गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिसे पेरी, मेगन शूट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"