Renuka Singh Thakur, CWG 2022, INDW vs AUSW : ५ बाद ४९ धावांवरून ऑस्ट्रेलियाचे कमबॅक; भारतीय संघाने गमावली विजयाची सोपी संधी

५ बाद ४९ अशी दयनीय अवस्था झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण, एश्लेघ गार्डनर ( Ashleigh Gardner ) हिने एकहाती सामना फिरवला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 06:39 PM2022-07-29T18:39:36+5:302022-07-29T18:40:18+5:30

whatsapp join usJoin us
INDW vs AUSW : Renuka Singh Thakur Takes 4 wickets, but Australia women have defeated India by 3 wickets, Ashleigh Gardner masterclass innings takes Australia home | Renuka Singh Thakur, CWG 2022, INDW vs AUSW : ५ बाद ४९ धावांवरून ऑस्ट्रेलियाचे कमबॅक; भारतीय संघाने गमावली विजयाची सोपी संधी

Renuka Singh Thakur, CWG 2022, INDW vs AUSW : ५ बाद ४९ धावांवरून ऑस्ट्रेलियाचे कमबॅक; भारतीय संघाने गमावली विजयाची सोपी संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CWG 2022, Indian Women vs Australian Women : १५५ धावांचे लक्ष्य उभे केल्यानंतर भारतीय गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर ( Renuka Singh Thakur ) हिने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला हादरवून टाकले. ५ बाद ४९ अशी दयनीय अवस्था झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण, एश्लेघ गार्डनर ( Ashleigh Gardner ) हिने एकहाती सामना फिरवला... ग्रेस हॅरीसने ३७ धावांची खेळी करून ऑसींचा डाव सावरला. त्यानंतर गार्डनरने एलाना किंगसोबत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आणि अश्यक्यप्राय विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्स व ६ चेंडू  राखून हा सामना जिंकला. 

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur )हिने CWG2022 मध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान पटकावला. शेफाली वर्मानेही ४८ धावांची वादळी खेळी केली. ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक एलिसा हिली ( Alyssa Healy) हिने या सामन्यात मोठा विक्रम केला. तिने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये यष्टिंमागे १०० बळी टिपण्याचा पराक्रम करताना महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) विक्रम मोडला. या फॉरमॅटमध्ये १०० बळी घेणारी ती पहिली खेळाडू ठरली. 

स्मृती मानधना ( २४) व शेफाली यांनी चांगली सुरूवात करून दिली खरी, परंतु डार्सिए ब्राऊनने ही जोडी तोडली. यास्तिका भाटिया ( ८)  व शेफाली यांच्यातला ताळमेळ चुकला अन् ऑसींना आयती विकेट मिळाली. जेमिमान रॉड्रिक्सही ११ धावा करून बाद झाली. शेफाली ३३ चेंडूंत ९ चौकारांसह ४८ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने मोर्चा सांभाळला. तिने ३४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. मिगन शटने तिची विकेट घेतली. भारताने ८ बाद १५४ धावा केल्या. इंग्लंडमधील ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारतीय महिलांची ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्यांनी २०२१मध्ये इंग्लंडविरुद्ध ६ बाद १५३ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या जेस जॉनासेनने २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. 


ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही फार चांगली झाली नाही. दुसऱ्याच चेंडूव रेणुका सिंग ठाकूरने ऑसींना धक्का देताना एलिसा हिली ( ०) ला झेलबाद केले. त्यापाठोपाठ बेथ मूनी ( १०), कर्णधार मेग लॅनिंग (८) व ताहिला मॅकग्राथ ( १४) यांनी विकेट घेत रेणुकाने ऑस्ट्रेलियाला हादरवून सोडले. रेणुकाने ४ षटकांत १८ धावा देताना ४ महत्त्वाच्या विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ३४ अशी केली. त्यानंतर दीप्ती शर्मा व मेघना सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेत ऑसींना १०० धावांवर ६ धक्के दिले. ३७ धावा करणाऱ्या ग्रेस हॅरीसची विकेट घेत मेघनाने मोठे यश मिळवले. दीप्तीने आणखी एक विकेट घेतली. पण, गार्डनरने ३५ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ५२ धावा करताना ऑस्ट्रेलियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. एलाना किंगने १६ चेंडूंत नाबाद १८ धावा केल्या. ऑसींनी १९ षटकांत ७ बाद १५७ धावा करून विजय मिळवला. 

Web Title: INDW vs AUSW : Renuka Singh Thakur Takes 4 wickets, but Australia women have defeated India by 3 wickets, Ashleigh Gardner masterclass innings takes Australia home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.