नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय महिला 9 डिसेंबरपासून 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भारतीय संघ मोठ्या व्यासपीठावर दिसणार आहे, तर मराठमोळ्या स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. खरं तर मानधनाच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ 9 आणि 11 डिसेंबर रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर मालिकेतील पहिले दोन सामने खेळेल. तर 14, 17 आणि 20 डिसेंबर रोजी उर्वरित तीन सामने खेळवले जातील. लक्षणीय बाब म्हणजे दक्षिण आफ्रिकेत फेब्रुवारी 2023 मध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची असणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची प्रमुख खेळाडू पूजा वस्त्राकरला दुखापत झाल्यामुळे विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय स्नेह राणा ही देखील आगामी मालिकेचा हिस्सा नसणार आहे.
ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल.
नेट गोलंदाज - मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर, सिमरन बहादूर.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक
- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 9 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 11 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 14 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 17 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया - 20 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजल्यापासून
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: INDW vs AUSW The Indian Women's squad for the T20 series against Australia has been announced with Harmanpreet Kaur as the captain and Smriti Mandhana as the vice-captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.