Join us  

INDW vs ENGW : दिग्गजांच्या अनुपस्थितीत भारताची 'कसोटी', उद्यापासून थरार, फ्रीमध्ये पाहता येणार...

भारतीय महिला संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध कसोटी सामना खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 3:59 PM

Open in App

नवी मुंबई : ट्वेंटी-२० मालिका गमावल्यांनतर भारतीय महिला संघ इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. गुरूवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना खेळवला जाईल. ट्वेंटी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवून पाहुण्या इंग्लिश संघाने यजमानांना पराभवाची धूळ चारली. याच पराभवाचा वचपा काढण्याचे आव्हान हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील टीम इंडियासमोर असेल. खरं तर भारतीय संघ दिग्गज मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या अनुपस्थितीत प्रथमच कसोटी सामना खेळत आहे. तर, इंग्लिश संघाने शेवटच्या वेळी जुलै महिन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी खेळली होती. 

भारत विरूद्ध इंग्लंड सामन्याची वेळ भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना १४ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. 

सामन्याचे ठिकाण भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होत आहे. चाहत्यांना मोफत या सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. तसेच स्पोर्ट्स १८ या चॅनेलवरून देखील हा सामना पाहता येईल. याशिवाय जिओ सिनेमाच्या पवरही लाईव्ह प्रक्षेपण सुरू असेल.

इंग्लंडविरूद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल, सायका इशाक, रेणुका ठाकूर, तीतस साधू, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर.

इंग्लंडचा संघ -हीदर नाइट (कर्णधार), टॅमी ब्युमॉन्ट (यष्टीरक्षक), डॅनी व्यॉट, माइया बाउचियर, अॅलिस कॅप्सी, केट क्रॉस, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन गिलर, कर्स्टी गॉर्डन, एमी जोन्स, बेस हीथ (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, लॉरेन बेल. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडहरनमप्रीत कौरस्मृती मानधना