INDW vs NZW 1st ODI Match | अहमदाबाद : तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मृती मानधना हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत भारताचे कर्णधारपद सांभाळत आहे. आजपासून भारताचा महिला क्रिकेट संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळत आहे. अलीकडेच न्यूझीलंडच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. ट्वेंटी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर टीम इंडियाचा प्रवास साखळी फेरीतच संपला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने पराभूत केल्याने भारतीय संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही. स्मृतीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुन्हा एकदा ती सोप्या चेंडूवर बाद झाल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला. स्मृती सात चेंडूत पाच धावा करुन तंबूत परतली. तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर भारताला कर्णधाराच्या रुपात पहिला झटका बसला.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताची डोकेदुखी वाढली. कर्णधार हरमनप्रीत कौरला दुखापतीमुळे या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे स्मृती मानधनावर कर्णधारपदाची जबाबदारी आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मालिका पार पडत आहेत.
भारताची नियमित कर्णधार हरमनप्रीतला विश्रांती दिल्याने युवा खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली. साइमा ठाकूर न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण करत आहे. याशिवाय तेजल हसबनीस हिलादेखील टीम इंडियाची कॅप मिळाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताचा संघ -
स्मृती मानधना (कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दयालन हेमलथा, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस (पदार्पण), दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, साइमा ठाकूर (पदार्पण), रेणुका ठाकूर.
वन डे मालिकेचे वेळापत्रक -
२४ ऑक्टोबर, पहिला सामना
२७ ऑक्टोबर, दुसरा सामना
२९ ऑक्टोबर, तिसरा सामना
Web Title: INDW vs NZW 1st ODI Match Live Updates Indian skipper Smriti Mandhana gets trolled after being dismissed on an easy ball
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.