Join us  

INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

INDW vs SAW ODI Series : आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 1:37 PM

Open in App

INDW vs SAW 1ts ODI Match Live | बंगळुरू : आजपासून भारतीय महिला क्रिकेट संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. आफ्रिकेचा संघ भारतात ३ वन डे, १ कसोटी आणि ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिका बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये पार पडतील. सलामीच्या सामन्यासाठी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा आज तिचा २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे, तर आशा सोभना आजच्या सामन्यात भारताच्या वन डे संघात पदार्पण करत आहे. आशा सोभना भारताच्या वन डे संघात पदार्पण करणारी सर्वात वयस्कर (३३ वर्ष ९२ दिवस) खेळाडू ठरली.  बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर ही लढत होत आहे. महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामानंतर भारतीय संघाची ही दुसरी मालिका आहे. या आधी टीम इंडिया पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर गेली होती, जिथे भारतीय संघाने ५-० असा एकतर्फी विजय मिळवला. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), शेफाली वर्मा, दयालन हेमलथा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, आशा सोभना (पदार्पण), रेणुका सिंग ठाकूर. 

वन डे मालिकेसाठी भारतीय संघ -वन डे संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा चेत्री, दयालन हेमलथा, राधा यादव, आशा सोभना, श्रेयांका पाटील, सायका इशाक, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर, अरूधंती रेड्डी, प्रिया पुनिया.

वन डे मालिकेचे वेळापत्रक १६ जून - पहिला सामना १९ जून - दुसरा सामना२३ जून - तिसरा सामना 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय महिला क्रिकेट संघहरनमप्रीत कौरभारतीय क्रिकेट संघ