INDW vs SAW 2nd ODI Match Live Updates | बंगळुरू : वन डे मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे, तर आजचा सामना जिंकून मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी पाहुणा दक्षिण आफ्रिकेचा संघ लढत आहे. नाणेफेक जिंकून आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने विजयी सलामी दिली. त्यामुळे आजचा सामना दक्षिण आफ्रिकेसाठी 'करा किंवा मरा' असा आहे. आजच्या सामन्यातून अरूधंती रेड्डी भारताच्या वन डे संघात पदार्पण करत आहे.
पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्मृतीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २६५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ३७.४ षटकांत अवघ्या १२२ धावांत गारद झाला आणि भारताने १४३ धावांनी सलामीचा सामना जिंकला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दयालन हेमलथा, रिचा घोष, दीप्ती शर्मा, राधा यादव, पूजा वस्त्राकर, आशा सोभना, अरूधंती रेड्डी.
दरम्यान, स्मृती मानधनाची शतकी खेळी आणि भारतीय गोलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने पहिला सामना जिंकला. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल.
वन डे मालिकेसाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा चेत्री, दयालन हेमलथा, राधा यादव, आशा सोभना, श्रेयांका पाटील, सायका इशाक, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर, अरूधंती रेड्डी, प्रिया पुनिया.
वन डे मालिकेचे वेळापत्रक १६ जून - पहिला सामना १९ जून - दुसरा सामना२३ जून - तिसरा सामना