INDW vs SAW : रविवारपासून वन डे मालिकेचा थरार! स्मृतीचा चाहत्यांसाठी खास मेसेज

INDW vs SAW ODI Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारपासून तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 02:15 PM2024-06-15T14:15:19+5:302024-06-15T14:19:11+5:30

whatsapp join usJoin us
INDW vs SAW ODI Series A three-match ODI series is being played between India and South Africa from Sunday smriti mandhana special message for fans | INDW vs SAW : रविवारपासून वन डे मालिकेचा थरार! स्मृतीचा चाहत्यांसाठी खास मेसेज

INDW vs SAW : रविवारपासून वन डे मालिकेचा थरार! स्मृतीचा चाहत्यांसाठी खास मेसेज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

INDW vs SAW Schedule : दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. रविवारी १६ तारखेपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाणार आहे. आफ्रिकेचा संघ भारतात ३ वन डे, १ कसोटी आणि ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिका बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये पार पडतील. १३ जून रोजी एक सराव सामना खेळवला गेला. तर २८ जून ते १ जुलै या कालावधीत ४ दिवसीय कसोटी सामना होईल. सामन्याआधी भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने प्रेक्षकांना एक खास आवाहन केले आहे.

स्मृती म्हणाली की, दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी केवळ एक दिवस उरला आहे. १६ तारखेपासून वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. काही महिन्यांपूर्वी तुम्ही (चाहत्यांनी) महिला प्रीमिअर लीगमध्ये आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे मला आशा आहे की, आता आम्ही भारताकडून खेळताना देखील तुम्ही सामना पाहण्यासाठी याल आणि आम्हाला प्रोत्साहन द्याल.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ -
वन डे संघ
- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा चेत्री, दयालन हेमलथा, राधा यादव, आशा सोभना, श्रेयांका पाटील, सायका इशाक, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर, अरूधंती रेड्डी, प्रिया पुनिया.

ट्वेंटी-२० संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा,दयालन हेमलथा, श्रेयांका पाटील, उमा चेत्री, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, सजना संजीवन, दीप्ती शर्मा, राधा यादव, अमनज्योत कौर, आशा सोभना, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकूर, अरूधंती रेड्डी.
राखीव खेळाडू - सायका इशाक.

कसोटी सामन्यासाठी संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, शुभ सतीश, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, उमा चेत्री, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायका इशाक, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, अरूधंती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, प्रिया पुनिया.

वन डे मालिका
१६ जून - पहिला सामना 
१९ जून - दुसरा सामना
२३ जून - तिसरा सामना 

ट्वेंटी-२० मालिका 
५ जुलै - पहिला सामना 
७ जुलै - दुसरा सामना
९ जुलै - तिसरा सामना

Web Title: INDW vs SAW ODI Series A three-match ODI series is being played between India and South Africa from Sunday smriti mandhana special message for fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.