Join us

आफ्रिकन 'सफाई'!! टीम इंडियाच्या पोरींची कमाल, वनडे पाठोपाठ कसोटी मालिकाही जिंकली!

Shafali Verma Smriti Mandhana Sneh Rana, INDW vs SAW One Off Test: पुरुषांच्या संघापाठोपाठ महिला संघानेही आफ्रिकेला चारली पराभवाची धूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 17:37 IST

Open in App

Shafali Verma Smriti Mandhana Sneh Rana, INDW vs SAW: सलामीवीर शफाली वर्माचे दमदार द्विशतक, स्मृती मंधानाची शतकी खेळी आणि स्नेह राणाची अप्रतिम गोलंदाजी याच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर १० गडी राखून विजय मिळवला. या विजयासोबतच एकमेव कसोटी सामन्याची मालिका भारताने जिंकली. आधी वन डे मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप दिल्यानंतर कसोटी मालिकाही जिंकून भारतीय महिला संघाने आफ्रिकेची 'सफाई' करून टाकली. 

---------

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ बाद ६०३ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव २६६ धावांवर तर दुसरा डाव ३७३ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला शेवटच्या डावात केवळ ३७ धावांचे आव्हान होते. हे आव्हान भारतीय महिला संघाने चौथ्याच दिवशी पार केले आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला.

पहिल्या डावात शफाली वर्माच्या २०५ धावा आणि स्मृती मंधानाच्या १४९ धावांच्या बळावर भारताने ६०३ धावापर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या स्नेह राणाने अप्रतिम गोलंदाजी केली. तिने ७७ धावा देऊन तब्बल ८ गडी टिपले. आफ्रिकेकडून मारिझेन काप हिने ७४ तर सुने लूझ हिने ६५ धावा केल्या.

फॉलो-ऑनचा खेळ पुढे सुरु करताना दुसऱ्या डावात कर्णधार लॉरा वूल्फार्डने १२२ तर सूने लूझ हिने १०९ धावा केल्या. त्यामुळे आफ्रिकेने दुसऱ्या डावात ३७३ धावा केल्या. पण त्यांच्या दोन्ही डावांची बेरीज भारतापेक्षा केवळ ३७ धावाच जास्त झाली. त्यामुळे भारताला मिळालेले हे आव्हान सलामीवीरांनी ९.२ षटकात पूर्ण केले.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय महिला क्रिकेट संघस्मृती मानधनाभारत