स्मृती मानधना-जेमिमा रॉड्रीग्ज यांनी सावरले, पण ६ फलंदाज २७ धावांत OUT झाले

India Women vs Sri Lanka Women Asian Games Final 2023 : भारतीय महिला संघाला आशियाई स्पर्धा २०२३ च्या फायनमध्ये श्रीलंकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 01:07 PM2023-09-25T13:07:28+5:302023-09-25T13:07:56+5:30

whatsapp join usJoin us
INDW vs SLW Final : Smriti Mandhana ( 46) & Jemimah Rodrigues ( 42); lost 6 wickets in 27 runs, 117 runs target to Sri Lanka | स्मृती मानधना-जेमिमा रॉड्रीग्ज यांनी सावरले, पण ६ फलंदाज २७ धावांत OUT झाले

स्मृती मानधना-जेमिमा रॉड्रीग्ज यांनी सावरले, पण ६ फलंदाज २७ धावांत OUT झाले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Women vs Sri Lanka Women Asian Games Final 2023 : भारतीय महिला संघाला आशियाई स्पर्धा २०२३ च्या फायनमध्ये श्रीलंकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी चांगलेच सतावले. स्मृती मानधना ( ४६) आणि जेमिमा रॉड्रीग्ज ( ४२) या दोघांच्या ७३ धावांच्या भागीदारीने टीम इंडियाला सावरले होते, परंतु भारताचे ६ फलंदाज २७ धावांत तंबूत परतल्याने मोठी धावसंख्या उभी राहू शकली नाही.


आशियाई स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी घेतली. दोन सामन्यांच्या बंदीनंतर कर्णधार हरमनप्रीत कौरचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे संघात बदल पाहायला मिळाला. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी सकारात्कम सुरुवात करून दिली, परंतु इनोशी प्रियदर्शनीने तिसरे षटक निर्धाव फेकून भारतावर दडपण टाकले. त्या दबावात शफाली ( ९) फटका मारायला गेली अन् सुगंधिका कुमारीच्या चेंडूवर ती स्टम्पिंग झाली. भारताला १६ धावांवर पहिला धक्का. जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती यांनी संयमी खेळ करताना अर्धशतकी भागीदारी करून भारताची गाडी रुळावर आणली.

 
श्रीलंकेने फिरकी मारा करून भारताच्या धावगतीला वेसण घातले होते. स्मृती व जेमिमाने सेट झाल्यावर हात मोकळे करण्यास सुरूवात केली. स्मृती ४५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४६ धावांवर बाद झाली, जेमिमासह तिची ७३ धावांची भागीदारी संपुष्टात आली. इनोकाच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात स्मृती झेलबाद झाली. रिचा घोषने आल्याआल्या हात मोकळे केले अन् खणखणीत षटकार खेचला. पण, ९ धावांवर तिला माघारी जावे लागले. कर्णधार हरमनप्रीत कौर २ धावांवर माघारी परतली. पूजा वस्त्राकरही ( २) लगेच माघारी परतल्यानं भारताची गाडी पुन्हा रुळावरून घसरली. भारताला २० षटकांत ७ बाद ११६ धावाच करता आल्या. जेमिमा ४२ धावांवर बाद झाली.

Web Title: INDW vs SLW Final : Smriti Mandhana ( 46) & Jemimah Rodrigues ( 42); lost 6 wickets in 27 runs, 117 runs target to Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.