नवी दिल्ली : क्रिकेटपासून लक्ष हटवीत वैयक्तिक जीवनासाठी वेळ देण्याचे महत्त्व सांगितल्यमुळे माजी दिग्गज राहुल द्रविडचा आभारी राहीन, असे भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने म्हटले आहे. c असेही पुजारा म्हणाला.
द्रविडला भारतीय फलंदाजीची ‘भिंत’ मानली जाते आणि पुजाराची तुलना नेहमी द्रविडसोबत केली जाते. पुजारा म्हणाला, वैयक्तिक व व्यावसायिक जीवनाला वेगळे ठेवण्याची पद्धत शिकविल्यामुळे द्रविडचा आभारी आहे. द्रविडने मला क्रिकेटपासून दूर राहण्याचे महत्त्व समजावून सांगण्यास मदत केली. माझ्याकडे केवळ एकच विचार होता, पण ज्यावेळी मी त्याच्यासोबत चर्चा केली त्यावेळी त्याने मला याबाबत स्पष्टपणे सांगितले. मला अशा सल्ल्याची गरज होती.’ द्रविडने १६४ कसोटी सामन्यात १३,२८८ धावा आणि ३४४ वन-डेमध्ये १०,८८९ धावा केल्या आहेत. त्याने ७९ वन-डे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले असून त्यापैकी ४२ सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला आहे. त्याच्या नावावर लक्ष्याचा पाठलाग करताना सलग १४ सामने जिंकण्याचा विक्रम आहे. द्रविडसोबत जवळीक निर्माण झाल्यानंतरही मी कधीच त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला नाही, असेही पुजारा म्हणाला.
‘मी कौंटी क्रिकेटमध्येही अनुभवले की द्रविड कधीच वैयक्तिक व व्यावसायिक जीवन याची सरमिसळ होऊ देत नव्हता. मी त्याच्या सल्ल्याला बरेच महत्त्व देतो. अनेकांना वाटते की मी माझ्या खेळावर गरजेपेक्षा अधिक लक्ष देतो. होय, हे सत्य आहे, पण व्यावसायिक जीवनापासून केव्हा दूर राहायचे, याची मला कल्पना आहे. क्रिकेट व्यतिरिक्तही जीवन आहे. माझ्या आवडीनिवडी बदलत असतात; पण द्रविड माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी नेहमी तो प्रेरणास्रोत राहिलेला असून भविष्यातही राहील.’ -चेतेश्वर पुजारा
Web Title: The influence of Dravid in my life cannot be described in words - Cheteshwar Pujara
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.