Join us  

Story of Mumbai Indians Name : ...तर मुंबई इंडियन्स आज वेगळ्याच नावानं ओळखली गेली असती, काय होतं ते नाव अन् सचिन तेंडुलकरनं दिला कोणता सल्ला?

Story of Mumbai Indians Name : २४ जानेवारी २००८ मध्ये मुंबई इंडियन्सनं त्यांच्या संघाची स्थापना केली होती. लखनौ फ्रँचायझीनंही २४ जानेवारीचा मुहूर्त काढून नाव जाहीर केलं आणि मुंबई इंडियन्सच्या नावामागची स्टोरी समोर आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 9:57 AM

Open in App

Story of Mumbai Indians Name : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५व्या पर्वात लखनौ व अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझी मैदानावर उतरणार आहेत. संजिव गोएंका यांच्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी त्यांच्या संघाचे नाव लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants) असे जाहीर केले. विशेष बाब म्हणजे २४ जानेवारी २००८ मध्ये मुंबई इंडियन्सनं त्यांच्या संघाची स्थापना केली होती. लखनौ फ्रँचायझीनंही २४ जानेवारीचा मुहूर्त काढून नाव जाहीर केलं आणि मुंबई इंडियन्सच्या नावामागची स्टोरी समोर आली. आज मुंबईचा संघ Mumbai Indians नावानं ओळखला जातो, पण त्याचं  नाव काही वेगळं असतं, जर सचिन तेंडुलकरनं ( Sachin Tendulkar) एक सल्ला दिला नसता.. काय होतं ते नाव अन् सचिननं कोणता सल्ला दिला होता?

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स टॉपवर आहे. सर्वाधिक ५ जेतेपदं मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत आणि २०११ व २०१३ साली त्यांनी चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकली आहे. २००८मध्ये या संघाची स्थापना झाली आणि रिलायन्सकडे या संघाचे मालकी हक्क आहेत.  २०१७मध्ये या संघानं ब्रँड व्हॅल्यूत १०० मिलियन डॉलरचा टप्पा ओलांडून इतिहास रचला. १०० मिलियन ब्रँड व्हॅल्यू असलेली ती पहिली फ्रँचायझी ठरली. २०१९मध्ये मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू ८०९ कोटींपर्यंत केली आणि आयपीएल फ्रँचायझींमध्ये ही सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू आहे. 

ट्वेंटी-२०त १०० सामने जिंकणारा हा पहिला संघ आहे. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० मध्ये आयपीएल जेतेपद जिंकली आहेत. रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ही जेतेपद जिंकली आहेत. 

नावामागची गोष्ट...मुंबई संघाच्या लोगोमध्ये सुदर्शन चक्र दिसतंय आणि त्यामुळे सुरुवातीला या फ्रँचायझीचे नाव मुंबई रेझर्स असे ठेवण्याचा विचार सुरू होता, परंतु सचिन तेंडुलकरनं मुंबई इंडियन्स असे नाव ठेवण्याचा सल्ला दिला आणि तो ऐकला गेला.  

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्ससचिन तेंडुलकररोहित शर्मा
Open in App