Join us  

विराटसेनेला दिलासा, दक्षिण आफ्रिकेची 'रन'मशीन पहिल्या तीन वन-डेतून बाहेर

कसोटी मालिकेत भारताच्या पराभवचे मुख्य कारण ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा दमदार फलंदाज पहिल्या तीन वन-डेमधून बाहेर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 2:28 PM

Open in App

जोहन्सबर्ग - कसोटी मालिकेत भारताच्या पराभवचे मुख्य कारण ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा दमदार फलंदाज पहिल्या तीन वन-डेमधून बाहेर झाला आहे.  कसोटी मालिकेत वर्चस्व गाचवणाऱ्या द. आफ्रिकेच्या संघाला धक्का बसला असून धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांना मुकणार आहे. अखेरच्या कसोटी सामन्यात डिव्हिलियर्सच्या बोटाला दुखापत झाली होती.  या दुखापतीमुळे पहिल्या तीन वन-डेत खेळू शकणार नाही. 

डिव्हिलियर्सच्या उजव्या हाताच्या बोटाला भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी दरम्यान दुखापत झाली होती. ही दुखापत बरी होण्यासाठी त्याला जवळपास दोन आठवडे लागणार आहेत. तो चौथ्या सामन्यामध्ये खेळेल, अशी अपेक्षा आहे. उद्या एक फेब्रुवारीपासून भारत आणि द.आफ्रिकेमध्ये सहा सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. मात्र एबी डिव्हिलियर्स दुखापतग्रस्त झाल्याने आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. एबी डिव्हिलियर्स सध्या चांगल्या फॉर्मात असून कसोटी मालिकेमध्ये त्याने आफ्रिकेच्या विजयामध्ये महत्वाची भुमिका बजावली होती. मात्र सध्या दक्षिण आफ्रिकेनं डिव्हिलियर्सच्या जागी कोणत्याही राखीव खेळाडूची निवड केलेली नाही. मिळालेल्या सुत्रानुसार, एबी डिव्हिलियर्सच्या जागी पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आफ्रिकेच्या संघात खाया झोन्डोची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

भारतीय टीमनं गाळला घाम, धोनीही उतरला मैदानात  उद्यापासून सुरु होणाऱ्या वन-डे मालिकेपूर्वी भारतीय संघानं जोरदार सराव केला आहे. डरबनच्या मैदानात धोनी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, विराट कोहलीसह संघातील इतर खेळाडूंनी घाम गाळला. भारतीय संघाच्या सरावाचा फोटो बीसीसीआयनं ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये धोनी, केदार जाधव आणि शिखर धवन सराव करताना दिसत आहेत.

मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारताचा युवा खेळाडू श्रेयस अय्यरनं धोनीवर विश्वास दाखवला आहे. धोनी टीममध्ये आल्यामुळे टीम मजबूत झाली आहे. त्यामुळे आम्ही जोरदार पुनरागमन करू, असं श्रेयस अय्यर म्हणाला आहे. भारताच्या वन-डे संघामध्ये शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. चायनामन स्पिनर असलेला कुलदीप यादवनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कुलदीपनं 14 वनडेमध्ये 22 विकेट घेतल्या आहेत. वनडेमध्ये कुलदीपचा इकोनॉमी रेट 4.88 एवढा आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८एबी डिव्हिलियर्सविराट कोहली