अहमदाबाद : भारताविरुद्ध मंगळवारपासून पुणे येथे सुरू होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी इंग्लंडने १४ सदस्यांचा संघ जाहीर केला असून, त्यात दुखापतग्रस्त जोफ्रा आर्चरला वगळण्यात आले.
इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनने शनिवारी स्पष्ट केले होते की, आर्चर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर राहण्याची शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे या स्टार वेगवान गोलंदाजाचा आयपीएलमधील सहभागही अनिश्चित आहे. कारण आर्चरच्या कोपराची दुखापत बळावली आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डने (ईसीबी) दिलेल्या माहितीनुसार, ‘आर्चर दुखापतीवर उपचारासाठी ब्रिटनला परतत आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला अनफिट घोषित केले गेले आहे.’ तीन अतिरिक्त खेळाडू जॅक बॉल, ख्रिस जॉर्डन व डेव्हड मलान कव्हर म्हणून संघासोबत असतील. नुकताच झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत संघाचे सदस्य होते.
आयपीएलमध्ये काही सामने बाहेर बसणार
इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनने खुलासा केला की, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची कोपराची दुखापत चिघळत आहे. त्यामुळे तो भारताविरुद्ध आगामी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका व त्यानंतर इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर होण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डने (ईसीबी)रविवारी सांगितले की, कोपराच्या दुखापतीमुळे आर्चरला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. शिवाय तो आयपीएलमध्येही सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही.’
आर्चरच्या उजव्या हाताच्या ढोपरामध्ये सुरुवातीपासून वेदना होत होत्या. त्याच्या वेदना आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे तो २३ मार्चपासून पुणे येथे खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळू शकेल किंवा नाही, याबाबत निश्चित सांगता येत नसल्याचे मॉर्गन म्हणाला.
Web Title: Injured Joffra Archer ‘out ’; The England squad will also miss the opening IPL matches
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.