विल्यमसन पडद्यामागून सूत्रे हलवणार? दिग्गज खेळाडू वन डे विश्वचषकात असणार नव्या भूमिकेत

kane williamson injury : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 07:47 PM2023-04-26T19:47:56+5:302023-04-26T19:48:31+5:30

whatsapp join usJoin us
Injured Kane Williamson will be part of the New Zealand team as a mentor for the ODI World Cup in India | विल्यमसन पडद्यामागून सूत्रे हलवणार? दिग्गज खेळाडू वन डे विश्वचषकात असणार नव्या भूमिकेत

विल्यमसन पडद्यामागून सूत्रे हलवणार? दिग्गज खेळाडू वन डे विश्वचषकात असणार नव्या भूमिकेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

kane williamson injury update ipl 2023 । मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2023) १६व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. गतविजेत्या गुजरातने टायटन्सने चेन्नईला पराभवाची धूळ चारून विजयी सलामी दिली. मात्र, गुजरातचा स्टार खेळाडू केन विल्यमसनच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला. सीमारेषेवर कठीण झेल घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विल्यमसनला दुखापत झाली अन् तो संपूर्ण आयपीएलमधून बाहेर झाला. लक्षणीय बाब म्हणजे आगामी वन डे विश्वचषकाला देखील विल्यमसन मुकणार आहे.

केन विल्यमसन २०२३ च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत दुखापतग्रस्त असूनही त्याच्या संघासोबत असण्याची शक्यता आहे. कारण संघ व्यवस्थापन त्याला मार्गदर्शक म्हणून निवडण्याची शक्यता आहे. तसेच न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकासाठी विल्यमसन संघासोबत असेल.

विल्यमसन असणार नव्या भूमिकेत
खरं तर विल्यमसन सध्या विश्रांती घेत असून क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ESPNCricinfoने दिलेल्या वृत्तानुसार, "आताच्या घडीला विल्यमसन क्रिकेट खेळण्यासाठी तंदुरूस्त नाही. विश्वचषकापर्यंत त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यानंतर तो भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी न्यूझीलंडच्या संघाचा मार्दगर्शक म्हणून मैदानात असेल, असे न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी म्हटले आहे."

तसेच वन डे विश्वचषक स्पर्धेत विल्यमसनच्या अनुपस्थितीमुळे मार्क चॅपमॅन त्याची कमी भरून काढेल अशी आशा आहे. सुदैवाने मार्क चॅपमन किवी संघासाठी चमकदार कामगिरी करत आहे. त्याने अलीकडेच पाकिस्तानविरूद्ध ट्वेंटी-२० सामन्यात शानदार झळकावले आहे, असे गॅरी यांनी अधिक सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 


 

Web Title: Injured Kane Williamson will be part of the New Zealand team as a mentor for the ODI World Cup in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.