ठळक मुद्देऑस्ट्रेलियात मेलबॉर्नमध्ये खेळताना 2014 साली महेंद्रसिंह धोनीने यष्टीपाठी नऊ झेल घेतले होते. यजमानांनी दुस-या डावात तिस-या दिवसअखेर २ बाद ९० अशी मजल मारली होती आणि त्यांच्याकडे आता एकूण ११८ धावांची आघाडी आहे.
नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी दुखापतग्रस्त वृद्धिमान साहाच्या जागी तामिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयकडून मेलद्वारे आज ही माहिती कळवण्यात आली. पहिल्या कसोटी सामन्यानंतर सरावादरम्यान सहाच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयची मेडिकल टीम सहाच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहे असे बीसीसीआयच्या मेलमध्ये म्हटले आहे.
सहा दुखापतग्रस्त झाल्यामुळे सहाजिकच दुस-या कसोटीसाठी त्याच्याजागी पार्थिव पटेलची निवड करण्यात आली. पहिल्या कसोटीत सहाला आपल्या फलंदाजीने प्रभाव पाडता आला नव्हता पण यष्टीपाठी त्याने चांगली कामगिरी केली होती. पहिल्या कसोटीत सामन्यात सहाने एकाच सामन्यात यष्टीपाठी सर्वाधिक झेल घेण्याचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला होता.
सहाने दोन्ही डावात मिळून यष्टीपाठी 10 झेल घेतले होते. ऑस्ट्रेलियात मेलबॉर्नमध्ये खेळताना 2014 साली महेंद्रसिंह धोनीने यष्टीपाठी नऊ झेल घेतले होते. एकाच सामन्यात दहा झेल घेणारा सहा पाचवा यष्टीरक्षक आहे. सहा रॉबर्ट टेलर, अॅडम गिलख्रिस्ट या यादीत आता सहाचे नाव जोडले जाईल.
दक्षिण आफ्रिकेकडे ११८ धावांची आघाडी
पहिल्या कसोटीप्रमाणे दुसºया कसोटीच्या तिस-या दिवशीही पावसाचा व्यत्यय आल्याने भारत - दक्षिण आफ्रिका दरम्यान सुरु असलेला कसोटी सामना निर्धारीत वेळेआधी थांबविण्यात आला. खेळ पुन्हा सुरु झाल्यानंतर यजमानांनी दुस-या डावात तिस-या दिवसअखेर २ बाद ९० अशी मजल मारली होती आणि त्यांच्याकडे आता एकूण ११८ धावांची आघाडी आहे. डिव्हिलियर्स नाबाद ५०, तर डीन एल्गर नाबाद ३६ धावांवर खेळत आहेत.0
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने उभारलेल्या ३३५ धावांचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव ३०७ धावांमध्ये संपुष्टात आला. कर्णधार कोहलीच्या (१५३) तडाखेबंद दीडशतकाच्या जोरावर भारतावरील मोठ्या आघाडीचे संकट टळले. तरी, यजमानांनी २८ धावांची नाममात्र आघाडी घेत वर्चस्व मिळवले. यानंतर दुस-या डावात फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकेची सुरुवात मात्र अडखळती झाली. जसप्रीत बुमराहने भेदक माºयाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला दोन धक्के दिले.
Web Title: Injured Saha out for Third Test, this player will replace saha
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.